पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३२६ )

त्याच्याशी एक तह केला. * या तांत, " तंजावरचा किल्ला इंग्रजांच्या ताब्यांत राहावा, त्याच्या संरक्षणाकरितां इंग्रजी सैन्य तंजावर येथे कायम चे राहावें, त्या सैन्याच्या खर्चासाठी, तंजावरच्या राजानें दरसाल १४ लक्ष रुपये इंग्रजांस देत जावे, व त्याशिवाय पूर्वीप्रमाणेच, अर्काटकर नबाबा- स दरसाल ४ लक्ष रुपये खंढणी देत जाबी " अर्से ठरलें. अशा रीतीनें या तंजावरच्या राज्याचा पुनर्जन्म होऊन, तें पुढें कांहीं काळ जिवंत राहिले. 

 तंजावरचा राज्यकर्ता तुळाजी हा पदभ्रष्ट होऊन त्यास इंग्रजांनी केंद केले ( ता० १७ सप्टेंबर, इ० सन १७७३), त्या दिवसापासून त्यास इंग्रजांनी पुन्हा गादीवर बसविले. त्या वेळेपर्यंत ( ता० ११ एप्रिल इ० सन १७७६), तंजावरचा प्रांत महंमदअल्लीच्या ताब्यांत होता. त्या सरासरी तीन वर्षांच्या अवर्धीत त्यानें तंजावरच्या प्रजेवर अतिशय जबरदस्ती व जुलूम करून तिला पिळून काढिले व त्या संपन्न प्रांताची त्यानें इतकी धुळधाण करूत टाकिली कीं, त्या हतभागी संस्थानाचें पूर्वीचें वैभव त्यास अल्पांशानेंही प्राप्त होण्यास दहा वर्षे लागली. परंतु तंजावरचें राज्य पुन्हा जिवंत होऊन, तंजावरच्या गादीवर तुळाजीची पुन्हा स्थापना होऊन कांहींशीं स्थिरस्थावर होते न होते – आणि युद्धे व नबाबाचा स्वार्थी व पिळून काढणारा अंमल, या मुळे विपन्नावस्थेत आलेली तंजावरची दुर्दैवी प्रजा नुकतीच कोठें आतां थाडीशी सांवरून, ती सुखाने नांदू लागते न लागते- -तोच म्हैसूरचा हैदरअल्ली नाईक व इंग्रज यांच्यामध्यें युद्ध सुरू 


 * या प्रसंगाची सविस्तर हकीकत, कोर्ट ऑफू डायरेक्टर्स यांच्या हुकमा- वरून प्रसिद्ध झालेल्या कागदपत्रांत नमूद केलेली असून, ती फार मनोरंजक व महत्वाची आहे; परंतु स्थलाभावामुळे, व या परिशिष्टोत तंजावरच्या राज्याची माहिती त्रोटक द्यावयाची असल्यामुळे, तिचा या ठिकाणीं, अधिक समावेश केला नाहीं; ह्या तंज:वर प्रकरणांतील उपरीनिर्दिष्ट सर्व कागदपत्र “ Rou's Restoration of the King of Tanjore " ह्या ग्रंथांत नमूद आहेत. ज्यांस ते वाचण्याची इच्छा असेल, त्यांनी तो ग्रंथ पाहावा.