पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३२७)

झालें आणि इ० सन १७८० च्या जुलई महिन्यांत हैदरअल्ली हा आपल्या ८० हजार सैन्यासह म्हैसूरच्या डोंगरांतून निघून कर्नाटकाच्या सपाट, सुपीक व संपन्न प्रदेशावर एखाद्या जंगी तुफानाप्रमाणें येऊन कोसळला. आणि तंजावरकर हे इंग्रजांचे स्नेही, त्यामुळे हैदरअल्लांचे शत्रु असल्यानें, त्यानें तंजावरच्या राज्यांत आपले थोडेंसें सैन्य ठेवून मोठाच धुमाकूळ उडविला व त्याच्या घोडेस्वारांच्या सैन्यानें थेट मद्रासच्या सिमपर्यंत कर्नाटक प्रांत उध्वस्त करून टाकिला. ही हकीकत ब्रिटिश हिंदुस्थानचा गव्हर्नर जनरल वारन हेरिंग्ट्स यास कळल्यावर त्यानें सर आयर कूट, याजबरोबर सैन्य देऊन त्यास कलकत्ता येथून ताबडतोब हैदरअल्लीवर रवाना केले व कल- कत्तेकराच्या हुकुमाप्रमाणे कूट यानें हैदरभल्लांस पोटॉनोव्हो येथे गांठून त्याचा पूर्ण पराजय केला; तेव्हां हैदरचें सैन्य तंजावर येथून निघून गेलें, त्यानंतर लवकरच [इ० सन १७८२ मध्यें हैदरअल्ली मृत्यु पावला व त्या वेळेपासून तंजावर संस्थान म्हैसूरकर वगैरे शत्रूच्या त्रासापासून मुक्त झाले. 

 तुळाजी राजे हे इ. सन १७८७ मध्यें मृत्यु पावले. त्यांस मोहनाबाई, राजसबाई व राजकुंवरबाई अशा तीन वायका होत्या; त्यांपैकी पहिली मोह- नाबाई ही इ. सन १७७६ मध्ये मृत्यु पावली व दुसऱ्या दोघींस पुत्र- संतान झालें नाहीं, सबब तुळाजीनें सुलक्षणाबाई व मोहनाबाई, अशा दोन नवीन बायका केल्या. त्यांपैकी मोहनाबाईपासून त्यास एक मुलगा झाला, परंतु तो सहा वर्षांचा होऊन मृत्यु पावला. अशा प्रकारें, तुळाजीराजे यांस पुत्र होऊनही शेवटी पुत्रसंतति नसल्यानें, त्यानें एक मुलगा दत्तक घेतला होता. तुळाजी मृत्यु पावला, त्या वेळी तंजावर संस्थानची स्थिति खालावलेली होती व अनेक संकटपरंपरा अनुभवीत अकरा वर्षे राज्य करून तुळाजी मृत्यु पावला होता. "तंजावर बालकाचा महाराष्ट्र माहेपासून वियोग झालेला होताच. इंग्रज व हैदरअल्ली यांच्या कचाट्यांत तंजावर सांपडलेले होतेंच; त्याला मराठ्यांच्या स्वान्यांपासून, अथवा त्यांनी हैदरवर मिळविलेल्या विजया- पासून कांहींच मदत झाली नव्हती. त्या वीस वर्षांत त्याची भयंकर दुर्दशा उडाली व टिपू लढाईत पडल्यानंतर दक्षिण हिंदुस्थानांत जरी शांतता झाली, तरी तंजावरची कुदशा कधीही संपलीच नव्हती; आणि बुडत्याचा पाय खोलांत