पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३३९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३२८ )

म्हणतात त्याप्रमाणे तंजावरच्या राज्यांत, (राज्यप्राप्तीकरितां ) आपआप- सांत कलद्दद्दी चाललेच होते.” तुळाजीच्या मृत्यूनंतर त्याचा सावत्र भाऊ अमरसिंह उर्फ अमरसिंग हा गादीवर आला, तरीसुद्धां हे कलह तसेच पुढे चालू राहिले होते. याचा परिणाम स्वाभाविकरित्याच तंजावरच्या संस्था- नावर अत्यंत अनिष्ट असाच झाला आणि आधींच खालावलेल्या त्या संस्थानाची विशेषच विपन्नावस्था झाली. 

 तुळाजी राजे इ. सन १७८७ मध्ये मृत्यु पावले. त्यापूर्वी त्यानें भोंस- त्यांचे मूळ पुरुष मालोजी राजे, यांचा बंधु विठोजीराजे याच्या वंशांतील, सुभानजीचा नातू व शहाजीचा मुलगा दत्तक घेऊन त्याचें नांव सरफोजी अर्से ठेवून, त्यास तंजावरच्या गादीचा वारस केलें. तंजावर येथील ब्रिटिश रेसिडेंट मि. मॅक्लोड व तेथील डॅनिश मिशनरी मि. स्वार्झ यांच्या संमतीने तुळाजीनें हैं दत्तविधान करून त्यास आपल्यामार्गे तंजावरच्या गादीचा अधिपति करावे, अशी मि. मॅक्लोड याच्यामार्फत व्यवस्था केली. रे. स्वार्झ यानें त्या मुलाचें ( या वेळीं तो नऊ वर्षांचा होता. ) पाळग्रहण करावें, असें ठरविले व त्यानंतर तुळाजी राजे यानें इहलोकीची जीवनयात्रा समाप्त केली. 

 तुळाजीराजे गृत्यु पावल्याचें वर्तमान अमरसिंह यांस समजतांच तो ताब- डतोब तंजावर येथे आला. तुळाजीराजे याची उत्तरक्रिया केली; सरफोजी स आपल्या ताब्यात घेतले आणि लागलीच मद्रास येथील गव्हर्नर सर आर्चि बाल्ड कॅम्बेल याच्याशी पत्रव्यवहार करून, "तंजावरच्या गादांचे आपणच खरे वारस आहोत, आणि सरफोजांचे दत्तविधान अशास्त्र आहे." असे सिद्ध करून देतो, असे त्यास कळविले. तेव्हां या बाबतीची चौकशी करण्याकरितां कॅम्बेल हा स्वत: तंजावर येथे गेला, चौकशी केली. कांहीं विद्वान् पंडितांच्या साक्षी घेतल्या. सरफोजीचा तंजावरच्या गादीवर हक नाहीं, असें ठरविलें. अमरसिंह यांस तंजावरच्या गादीचा वारस ठरवून, त्यास तंजावरच्या गादी- वर बसविण्याचा ठराव केला, आणि ता. १० एप्रिल इ. सन १७८७ रोजी इंग्रजांनी त्याच्याबरोबर तह करून त्यास तंजावरच्या राज्यावर बसविलें. हा तह फार महत्त्वाचा असून त्या योगानें, तंजावरचें राज्य बहुतेक ईस्ट