पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३३४ )

-मद्राससरकाराकडे परत पाठविलें, मद्रासचा गव्हर्नर लॉर्ड होबर्ट यानें वरिष्ठ सरकारच्या म्हणण्याला पुष्टि दिली व हे प्रकरण कोर्ट ऑफ डायरेक्टर्स यांच्या मंजुरीसाठी विलायतेस पाठविलें. त्यांनी इ० सन १७९८ मध्ये या चादग्रत व महत्त्वाच्या प्रकरणाचा सरफोजांच्या तर्फेनें निकाल केला; आणि "अमरसिंह राजे यांस तंजावरच्या गादीवरून दूर करावें व त्याच्या जाग सरफोजीची स्थापना करावी, " असा मद्रासकरांना हुकूम दिला; त्याप्रमाणे मद्राससरकाराने राजे अमरसिंह यांस पदच्युत करून- तंजावरपासून २९ मैलांवर असलेल्या - मध्यार्जुन येथे नेऊन ठेविलें व तंजावर येथें कोणताही दंगाघोपा न होऊं देतां तेथील गादीवर सरफोजीची स्थापना केली.

 पदभ्रम राजे अमरसिंह यांस मध्यार्जुन येथे दरसाल पंचाहत्तर हजार रुपयांची नेमणूक करून दिलेली होती; तिचा उपभोग घेत राहिला व त्या ठिकाणीं तो इ० सन १८०२ मध्ये मृत्यु पावला. + राजे अमरसिंह यांच्या योग्यतेसंबंधी निश्चित अर्से कांहींच म्हणतां येत नाहीं. तंजावर व मध्यार्जुन येथील त्यांच्या लोकेकावरून तो मोठा दयाळु, आणि उदार राज्यकर्ता होता, असे निदर्शनास येतें. “इंग्रजी इतिहासकारांनी अमरसिंह याची आपल्या पुतण्याशी जी वागणूक असल्याचें लिहिले आहे. ती तो सौम्य, दयाळू व उदार राज्यकर्ता होता, असा जो त्याचा स्थानिक लौकिक आहे, त्याला अगदीच विरुद्ध अशी आहे. तथापि तो कमकुवत मनाचा होता. तो आपल्या प्रेमांतील मंडळींच्या सांगण्याप्रमाणे वागत होता, त्यामुळे तो नकळत कौटुंबिक द्वेषभावाला बहुतेक कारणीभूत झाला असावा. शिवाय त्या तरुण राजपुत्राच्या [सरफोजीच्या] फायद्याकरितां जो पक्ष निर्माण झाला होता. त्या पक्षाची अपकारकारक व बदसहयाची वागणूक यामुळे त्याचा आपल्या
   + पदभ्रष्ट राज्यकर्ता अमरसिंह, यास प्रतापसिंह या नांवाचा एक मुलगा होता, तो इ. सन १८४९ मध्ये मृत्यु पावला. त्यास औरस पुत्रसंतति नव्हती; म्हणून त्यानें व्यंकोजी या नावाचा एक मुलगा दत्तक घेतला होता. त्यास ब्रिटिश सरकाराकडून दरमहा एक हजार रुपये नेमणूक मिळत असे. तो इ. सन १८८३ पर्यंत विद्यमान होता.