पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३३५ )

पुतण्याविषयींचा प्रेमभाव नष्ट होणे अशक्य नव्हतें; अमरसिंहाचें आपल्या पुतण्यासंबंधांच्या वागणुकीचें खरें कारण व मनांतील हेतु कांहीही असो; परंतु त्याची आपल्या पुतण्यासंबंधीची असलेली वागणूक, अतिशय संशय उत्पन्न करणारी होती याबद्दल फारशी शंका आहे, असे दिसत नाहीं आणि असेंही म्हणतात कीं मि. स्वार्झ याला तर असेंही वाटत होतें कीं, "सरफो- जीच्या जिवाला अपाय होईल" (The Manual of Tanjore District; Page 8/9 ). थोडक्यांत सांगावयाचें म्हणजे अमरसिंहाची सरफोजीशों असलेलो वागणूक संशय उत्पन्न करणारी होती, असें दिसतें. तथापि इ. सन १७८७ च्या तहानें तंजावर प्रांतावर बसलेल्या जबर खंडणांचा व इतर कडक अटींचा निर्बंध कमी व्हावा, म्हणून त्यानें जे सतत भगीरथ प्रयत्न केले व इ. सन १७९२ मध्ये नवीन तह घडवून आणिला; त्यावरून त्याची चिकाटी, उद्योगप्रियता, स्वाभिमान व खटपटी स्वभाव, ह्रीं व्यक्त होतात; च तो निदान अगदीच नालायक राज्यकर्ता नसावा, असें अनुमान करण्यास जागा मिळते.

 राजे सरफोजी याची तंजावरच्या गादीवर इ. सन १७९८ मध्यें, स्थापना झाली; त्या वेळीं "मी तंजावरच्या गादीवर स्थापन झाल्यावर इ. सन १७९२ च्या तहांतील सर्व कलमें पूर्णपणे पाळीन व उभयपक्षांच्या हितासाठी इंग्रजांस कांही नवीन व्यस्था करणे झाल्यास त्यास मी मान्यता देईन; " असे कवूल करून घेतलें होतें. त्याप्रमाणे सरफोजी गादीवर बसल्यानंतर- राजे अमरसिंह यांच्या कारकीर्दीत, "तंजावरच्या राज्यव्यवस्थेत अतिशय अंदाधुंदी व घोंटाळे आहेत" असा बोभाटा त्याच्या प्रतिपक्षीयांनीं, व विशे षतः मि. स्वार्झ यानें केल्यामुळे - तंजावरच्या राज्यव्यवस्थेची चौकशी करण्याकरिता इंग्रजांनी एक कमिशन नेमिलें व त्या कमिशननें या बाबतींत इत्यंभूत चौकशी करून, व त्यांत तंजावरच्या मुलकी राज्यव्यवस्थेची भरपूर माहिती देऊन मद्राससरकारकडे एक विस्तृत यादी सादर केली ( ता. ३१ जानेवारी, इ० सन १७९९). या वेळी प्रसिद्ध लॉर्ड वेलस्ली या गव्हर्नर जनरलची कारकीर्द सुरू होती आणि " प्रत्येक एतद्देशीय राज्यावर ब्रिटिश- सरकारच्या हुकमी श्रेष्ठत्वाचा शह द्यावा, त्या श्रेष्ठ सत्तेशीं हातांखालील सत्ता,