पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३४७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३३६)

या नात्याच्या संबंधानें, सक्ती अगर सख्यत्वानें त्यांना बांधून घ्यावे आणि अशा प्रकारें ( इंग्रजांच्या ) साम्राज्यसत्तेच्या मध्यर्थीच्या अथवा नियंत्र- णाच्या अधिकाराला न जुमानणाऱ्या कोणत्याही भावी प्रयत्नाला जागा न ठेवून, त्वा सत्तेच्या ताब्यांतील प्रदेशाचा कायमचा सुरक्षितपणा स्थापन करावा, आणि सर्व हिंदुस्थानामध्ये सक्तीने शांतता प्रस्थापित करावी, असा त्याचा उघड उघड उद्देश होता, त्यामुळे म्हैसूरकर टिपू सुलतान मारला गेल्यावर ( इ० सन १७९९ मे ) मार्किस ऑफ वेलस्ली यानें म्हैसूरच्या राज्याची व्यवस्था केली, तेव्हा त्यानें सरफोजीचें मन वळवून, त्याच्याबरो- बर एक पंधरा कलमांचा तह करून [ ता. २५ आक्टोबर इ सन १७९९ रोजी ] त्याच्याकडून तंजावर संस्थानचा सर्व कारभार आपल्याकडे काढून घेतला. या तहानें संस्थान हे पूर्णपणे ब्रिटिश अमलाखाली गेले. या तहानें तंजावरकर सरफोजी राजे यानें फक्त साडेतीन लाख रुपये दरसाल नेमणूक, व राज्याच्या वसुलाचा पांचवा हिस्सा घेऊन तंजावरच्या किल्लांत स्वस्थ राहावें, आणि ब्रिटिशसरकारानें तंजावर प्रांताचें संरक्षण करून त्यांना सरफोजीच्या नांवानें राज्यकारभार चालवावा व त्याचा मानमतराब न इभ्रत कमी व होऊं देती आहे तशीच व्यवस्था कायम ठेवावी, असे ठरलें, आणि याच तहानें, इ० सन १७९९ मध्येच वास्तविकरीत्या तंजावरचे मराठी राज्य खालसा झाल्यासारखे झाले व याच वेळीं तंजावरच्या राज्याचा शत्रु जो कर्नाटकचा


 *“ The avowed object of Lord Wellesley had been to cnforce peace_throughout India, and to provide for the permanent security of the British possessions by imposing upon every Native State authoritative superiority of the British Government, binding them down forcibly or through friendly engagements to subordinate relations with a paramount power, and effectively forstalling any future attempts to challenge our exercise of arbitration or control."

66 British Dominion in Indis "

Page 269.