पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३५०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३३९ )

 अशा रितीने तंजावर प्रांताचा सर्व कारभार कंपनी सरकारच्या होत गेल्यानंतर सरफोजीनें आपले सर्व आयुष्य विद्याव्यासंग, विद्याप्रसार, विद्वात्समागम, लोककल्याण, व लोकपरामर्ष, यांत घालविलें. तंजावर येथें मोठमोठे विद्वान पंडित जमवून व त्यांना उत्तेजन देऊन, त्यांच्याकडून कित्येक संस्कृत ग्रंथ, काव्ये व नाटके तयार करविली. तंजावर येथील बृहदी- श्वराच्या देवालयामध्यें, प्राचीन चोल राजांनी लिहिलेल्या शिलालेखाप्रमाण त्याने आपल्या राजघराण्याचा संपूर्ण इतिहास मराठी शिलालेखामध्ये कोरून तयार करविला. तंजावरच्या राजवाड्यांत एक सरस्वतीमंदिर निर्माण करून तेथे अनेक विषयावरील प्राचीन ग्रंथ, ताम्रपत्रों, ताडपले, भूर्जपवें, वगैरे वस्तूंचा संग्रह केला. हा ग्रंथसंग्रह मोठा अमूल्य व अपूर्व असून त्याच्या •तोडोचा ग्रंथसंग्रह हिंदुस्थानांतील दुसन्या कोणत्याही संस्थानांत नाहीं. हा अंथसंग्रह पाहून पाश्चात्य विद्वान् थक्क झाले. इतकेच नाहींतर डॉ० बर्नेल- सारख्या जर्मन पंडितांना त्या ग्रंथांच्या नामावली तयार करण्याला वर्षांच्या वर्षे खर्च करावी लागली; यावरून हा ग्रंथसंग्रह अपूर्व असाच आहे, हें उघड आहे.

 सरफोजी राजे यांस शिल्पशास्त्र व संगितशास्त्र यांचाँही पुष्कळ अभि- रुचि होती; व त्याने आपल्या राजवाड्यांत अनेक प्रख्यात शिल्पकारांनी तयार केलेले पुतळे, व कलाकौशल्याच्या वस्तू, यांचाही मोठा वर्णनीय संग्रह केला होता. त्यास इंग्रजी भाषा, इतिहास, भूगोल, गणित वगैरे विषयांचे उत्तम ज्ञान होते, व वैद्यशास्त्र, व ज्योतिषशास्त्र, वगैरे विषयांची त्याला अभिरुची असून, त्यावरील ग्रंथ त्यानें आपल्या संग्रही ठेविले होते. व त्यांचें योग्य प्रकारे परिशीलनही केले होतें. तो मोठा रसिक, विद्याप्रिय, बहुश्रुत, गुणप्राहक, उदार, धार्मिक प्रवृत्तीचा व दानशूर असा श्रेष्ठ योग्यतेचा राज- पुरुष होता, अन्य धर्मीय लोकांस सम दृष्टीने वागवून, त्यांना नेहमी मदत करीत असे. तंजावर येलील मिशनरी लोकांच्या अनेक घर्मसंस्थांना, त्याच्या कडून उत्तम प्रकारची मदत मिळत होती; व त्यानें त्यांच्याकरितां स्वतंत्र अनाथगृह स्थापन केली होती. या बाबतीत रे. मि. कोलहॉफ यानें असे लिहिले आहे कीं, " माजी रेव्हरंड मि. स्वार्झ याच्याविषयों सरफोजीच्या