पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३५६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३४५ )

निराळा, देश निराळा, रंग निराळा; पण असे असून सुद्धा तुळाजी राजे हा आपल्या मृत्युसमयीं, आपला मुलगा सरफोजी याचा हात, मि. स्वार्झ याच्या हातांत देऊन त्याचे पालप्रहण करण्यास सांगतो. आणि मि. स्वार्झ हा तुळाजी राजाच्या शेवटच्या इच्छेस मान देऊन सरफोजीचें आपल्या मुलाप्र- माणे पालग्रहण करून, त्याला सिंहासनारूढ करण्याची पराकाष्ठा करतो, व त्याच्याच प्रयत्नामुळे, त्याच्या मृत्युनंतर का होईना, सरफोजी हा तंजावर येथील सिंहासनावर आरूढ होतो, ही गोष्ट कल्पनासृष्टीतील कादंबरीस साज- ण्यासारखी असून, ती सत्यसृष्टीत, तंजावरच्या इतिहासांत खरोखरीच घड- लेली आहे. तेथील इतिहासांत हा एक चिरस्मरणीय व वर्णनीय असाच विषय होऊन बसला आहे. व हा योगायोग मोठाच अपूर्व व अपवादकारक असाच घडून आला असल्यामुळे, तो अत्यंत महत्त्वाचा व लक्षांत ठेवण्यासारखाच आहे हे उघड आहे.

 थोडक्यांत म्हणजे सरफोजीराजे हा एक मोठाच विद्यासंपन्न, लोकप्रिय, रसिक, कीर्तिशाली, परिस्थिती ओळखून वागणारा व प्राप्तस्थितीत समा धान मानून राहणारा, असा एक अलौकिक पुरुष तंजावरच्या राजघराज्यांत निर्माण झाला. त्याच्या संबंधानें सुप्रसिद्ध बिशप हेबर याने जे वर्णन केले आहे, त्यांत तो म्हणतो:-" मी गेल्या चार दिवसांपासून तंजावरचा हिंदु राजा सरफोजी याच्या सहवासांत काळ घालवांत आहे. तो फोरकॉय लाव्हीशियर, लोनोअस, आणि बफन यांचे आधार, आपल्या बोलण्यांत


 अर्थ :- तूं दृढनिश्चयो होतास; नम्र, आणि शहाणा, प्रामाणिक, शुद्ध आणि निष्कपटी होतास. पोरक्या मुलांना बापाप्रमाणे, व विधवा स्त्रियांचा आश्रयदाता होतास तूं कोणत्याही दुःखाच्या वेळी शांतवन करणारा आणि आडमार्गानें गेलेल्यांना पुन्हा सुमार्गावर आणणारा होतास तूं जें योग्य असेल तेंच करणारा व जें बरोबर असेल तेच दुसण्यास सांगणारा आणि राज्यकर्ते, प्रजाजन व मी, यांचे कल्याण चिंतणारा होतास. हे माझ्या धर्मपित्या, मी तुला साजेन ( मी तुझा धर्मपुत्र शोभेन ) असे व्हावें, अशी मी इच्छा करतों, व हा तुझा सरफोजी तशां ( ईश्वराची ) प्रार्थना करतो.