पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३५७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ३४६)

वक्तृत्वपूर्ण रीतीनें देतो. लॉर्ड बायरन यानें, शेक्सपीयरच्या नाटय- विषयक बाबतीत मनोल्हासकारक रीतीनें जें मत प्रदर्शित केले आहे, त्या- हूनही अधांक बिनचूक रीतीनें शेक्सपीयरच्या कवित्वगुणाबद्दल सरफोजीने आपलें मत बनविले आहे. व शेनस्टोनच्या थडग्यावर रशियन यानें जो कविताबद्ध मृत्युलेख लिहिला आहे, त्यापेक्षां अतीश्रेष्ठ दरजाची इंग्रजी कविता सरफोजी यानें मि० स्वार्क्ष याच्या पुतळ्याखाली लिहिलेली आहे. त्याप्रमाणेच तो खरा उत्तम अश्वपारखी, आणि वाघावर न घाबरतो धीटपणानें अचुक प्राणघातक नेम मारणारा आहे; त्यामुळे आसपासचे इंग्रज अधिकारी स्याला अतीशय मान देत असतात. खरी गोष्ट ही की, सरफोजीराजे हा एक अलौकिक पुरुष आहे. प्रसिद्ध वृद्ध मिशनरी मि० स्वार्झ याच्याकडून त्याला त्याच्या पूर्ववयांत शिक्षण मिळालेले आहे; आणि पुष्कळ प्रतिकूल परिस्थितीमध्येही त्याने आपली इंग्रजी वाङ्मयाची गोडी कायम ठेविली आहे, व आपले इंग्रजी वाङ्मयविषयक ज्ञान वृद्धिंगत केले आहे; तरीसुद्धां पूर्वकालीन मराठा जे त्यांच्या वंशजाला साजेल, असे अंग- मेहनतीचे व्यायाम, व शिपाईबाण्याला शोभेल, अशी मोकळेपणाची वागणूक ह्या गोष्टीकडे त्याने आपले कधाही दुर्लक्ष केलें नाहीं, व केवळ यामुळेच, त्याला हल्लींच्या परिस्थितीत, लोकांच्या मनाच्या बनलेल्या समजुतींना न दुखवितो, आपली लोकप्रियता तशीच कामम ठेवतां आली आहे. जर तो हैदरअल्लीच्या वेळी असता तर ( इंग्लिशांचा, ) तो एक बलिष्ठ शत्रु किंवा मित्र, झाला असता; कारण त्याच्या आसपास असणाऱ्या सर्व लोकांच्या सांगण्यावरून तो मितव्ययी, धाडसी, लोकप्रीय व दुसन्यावर आपली छाप पाडून त्याचा विश्वास व प्रेम संपादन करणारा, असा आहे. या वेळी, इंग्लिश सरदाराइतकीही त्याची सत्ता नाहीं; तरीसुद्धां त्याची मान नेहमीं ताठ असते; व तो समाधानी आहे, असे दिसते. त्याच्या वाचनालयांत बोना- पार्टची तसबीर टांगून ठेविलेली आहे; व तेथें जवळच लॉर्ड हेस्टिंग्स याचाही पूर्ण पोषाखांत असलेली तसचीर असून, तिनें नेपोलियनची तसबार इतकी लोपून गेली आहे की तो कोणालाही अपाय करूं शकणार नाही. "