पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३५९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३४८)

राहिले नव्हते. तथापि अशा स्थितीतही सरफोजी राजे यानी विद्यादेवीची आराधना करून, विद्यादान देऊन, विद्वज्जनसमागम करून, व लोककल्याण साधीत राहून अतिशय लौकिक मिळविला. प्राप्त परिस्थितीत आपल्या आयु- ध्याचें इतिकर्तव्य उत्तम प्रकारें बजावून व जगांत आपली सत्कीर्ति कायम ठेऊन दैवगतीस पावला. परंतु शिवाजी राजे यांस विद्येची अभि- रुचि नसल्याने त्याचे सर्व आयुष्य नष्ट ऐश्वर्याच्या अवशिष्ट राजवैभवाचा उपभोग घेण्यांत, व ऐषआराम करण्यांत खर्च झाले. शिवाजी राजे यांस, ब्रिटिश सरकाराकडून नेमणूक व तंजावर राज्याच्या वसुलाचा पांचवा हिस्सा मिळून दरसाल १०,८०,९९३ रुपये मिळत असत. अर्थात् शिवाजी राजे यांस सुखोपभोग व ऐषआराम, यांना लागणारी सांपत्तिक अनुकूलता प्राप्त झालेली असल्यामुळे, त्यांनी आपल्या आयुष्याचा सर्व काळ चैनीत व विलासांत घालविला. तो ता. २५ आक्टोबर इ० सन १८५५ रोजों मृत्यु पावला. त्यास औरस पुत्रसंतती नव्हती. त्या वेळी प्रसिद्ध लॉर्ड डलहौसी हा हिंदुस्थानचा गव्हर्नर जनरल ( कारकीर्द इ० सन १८४८-१८५६;) होता. त्यानें इ० सन १८४९ मध्ये एक जाहिरनामा काढून त्या अन्वयें पंजाब प्रांत खालसा करून ब्रिटिश साम्राज्यास जोडला होता. खालील ब्रम्हदेश ब्रिटिश साम्राज्यसत्तेखालीं आणला होता. सातारा येथील शेवटचा राज्यकर्ता, आणि राजे प्रत्तापसिंह [ पदभ्रष्ट ता. ५ सप्टेंबर इ० सन १८३९; मृत्यु काशी येथें प्रतिबंधांत ता. १४ आक्टोबर इ० सन १८४७; दुपार नंतर तीन वाजतां ] याचा धाकटा भाऊ शहाजी ऊर्फ अप्पासाहेब ( मृत्यू ता. ५ एप्रील इ० सन १८४८) हा मृत्यू पावल्यावर त्यास औरस पुत्र संतती नसल्यामुळे, लॉर्ड डलहौसी यानें दत्तक घेण्यास मंजुरी देण्याचें नाकारले; आणि " त्याने असे तत्व आंखून टाकले होते की, 'औरस वारसदाराच्या अभावामुळे, जी मांड- लॉक संस्थानें, ब्रिटिश सार्वभौम सरकारास स्पष्ट आणि निःसंशय रीतीनें मिळालेली आहेत, त्या संस्थानाचा ताबा घेण्यास कर्तव्य आणि राजनीति, ह्या दोन्ही गोष्टींचा विचार करता, उलटपक्षी कांही कारण नसेल तर ते सरकार बांधले गेलेले आहे. ' या तत्वाप्रमाणे इ० सन १८४८ मध्ये