पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२५)

केला; त्या वेळी याही मोहिमेत मालोजीनें विशेष पराक्रम गाजविला; ( बृहदीश्वर शिलालेख ) व लागलीच दुसऱ्याच वर्षी इ० सन १५९३ मध्यें, इब्राहीम अदिलशहाचा भाऊ इस्माईल यानें कोल्हापूर व बेळगांव प्रांती बंड करून बुन्हाण निजामशहाची मदत मागितली; त्या वेळी त्या मदतीच्या सैन्यांत सामोल होऊन मालोजीनें, अदिलशाही सैन्यास कोल्हापूर प्रांतांत अतीशय भंडावून सोडिलें; थोडक्यांत सांगायाचे म्हणजे, मालोजी हा निजाम- शाहीत नौकरीस राहिल्यावर दिवसेंदिवस त्याचा सारखा उत्कर्ष होत चालला, व जाधवरावाचा व मालोजीचा बराच घरोबा झाल्यामुळे मालोजीचा मुलगा शहाजी हाही जाधवरावाकडे नेहमीं जाऊं लागला; शहाजी हा दिसण्यांत सुस्वरूप व हुषार असल्यामुळे त्याच्यावर जाधवरावार्चे प्रेम जडलें; जाधव- रावास जिजाऊ ऊर्फ जिजाबाई या नांवाची एक कन्या असून ( जन्म इ. सन १५९५ मध्ये ) ती व शहाजी हे उभयतां पुष्कळ वेळां एकत्रही खेळत असत. पुढे इ. सन १५९९ या वर्षी शिमग्याच्या सणांत रंगपंचमीनिमित्त जाधवरावानें आपल्या घरी एक मोठा समारंभ केला; त्याकरितां त्यानें आपल्या इष्टमित्रांना अमंत्रण केलें; व त्यांतच त्यानें मालोजीसही बोलाविलें. त्याप्रमाणें मालोजी हा आपला पांच वर्षांचा मुलगा शहाजी यांस बरोबर घेऊन त्या समारंभाकरितां जाधवरावाच्या घरी गेला. त्यावेळी जाधवरावानें शहाजीस हांक मारून लडिवाळपणानें आपणांजवळ बसवून घेतलें. इतक्यांत त्याची लाडकी मुलगी जिजाबाई हाँही घरांतून येऊन त्याच्याजवळ बसली व बाल- स्वभावानुरूप त एकमेकांवर गुलाल उधळू लागली. हे पाहून सर्वांना मोठे कौतुक वाटलें; व जाधवराव विनोदानें म्हणाला, मुली, तुला हा नवरा आवडतो काय ? हा जोडा फारच सुंदर दिसतो." जाधवरावानें हे शब्द त्या समारंभांत सर्वांसमक्ष सहज विनोदानें उच्चारिलें; परंतु मालोजीनें ते जमेस धरून अगदर्दी अक्षरशः खरें असें मानून-तो लागलीच उठून उभा राहिला; व तेथें जमलेल्या सर्व मंडळीस उद्देशून तो मोठ्यानें म्हणाला “ ऐकाहो, जाधवराव काय बोलले तें; आजपासून जाधवराव हे आमचे व्याही झाले; व जिजाऊ ही आमची सून झाली. आतां हा निश्चय बदलणार नाहीं. थोर लोक अशा सर्भेत बोललेले शब्द मार्गे घेणार नाहींत. " वास्तवीक पाहतां जाधव-