पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२६)

राव हा वरील शब्द सहज विनोदानें बोलून गेला होता; त्यामुळे, या विनो- दाचें पर्यवसान अकल्पित रीत्या अशा प्रकारें झालेले पाहून तो अगदा चकित झाला; भांबावून गेला; आणि त्यावर मालोजीस कांहोंही उत्तर न देतां स्तब्ध राहिला.

 अशा रीतीनें हा समारंभ आटोपल्यानंतर दुसऱ्या दिवशी जाधवरावानें सर्व इष्टमित्र मंडळीस आपल्या घरी जेवावयास बोलाविले. त्यावेळी त्यानें मालोजीसही निमंत्रण केलें. परंतु मालोजीनें तें नाकारून जाधवरावास असा निरोप पाठविला की, "तुम्ही आम्ही आतां व्याही झालों; त्यामुळे यापुढे लग्नसमा- रंभाच्या वेळी तुमच्याबरोबर आमचें भोजन होईल, तोपर्यंत आपण आम्हांस बोलावूं नये; " त्यानंतर हा सर्व प्रकार जाधवरावाची स्त्रो म्हाळसाबाई (कांहीं ठिकाणीं गिरजाबाई असा उल्लेख आढळतो. ) होस समजल्यावर तिला मालो- जाँचें हैं वर्तन उद्धटपणाचे आहे, असे वाटून अतौशय राग आला; व " मालोजी हा आपल्या बरोबरीचा सरदार नाही. सबब त्याच्या मुलाशीं आपल्या मुलीचा विवाह करणे अगदर्दी अनुचित आहे; असें असतां तुम्हीं हो गोष्ट कशी मान्य केली ?" वगैरे प्रकारानें ती जाधवरावास टाकून बोलली; “ सोयरीक या मुलीस करणे ती मातबर, मनसबदार पाहून ही कन्या बहुत समारंभें ज्याचे घरों फार दौलत, वस्त्रे अलंकार तेथें द्यावयाची आपण सभेत बोलला तें अनुचित; यांस देणें आमचे चित्तास येत नाहीं." असें म्हणून तिनें या विवाहास आपला नकार स्पष्टपणे जाधवरावास कळविला. त्यावर त्या समारंभांत मी असें सहज विनोदानें बोललो होतों; परंतु त्याबद्दल माझें वचन कोणत्याही प्रकारें गुंतलेलें नाहीं; " असें त्याने म्हाळसाबाईस सांगून तिचें समाधान केलें, व मालोजाँस " ही सोयरीक करण्यास आपण तयार नाहीं;" असा निरोप पाठविला; “शरीरसंबंधाची गोष्ट आपण बोलूं नये; आमचे घरांत कोणाचे विचारास येत नाहीं; ब्रह्मसूत्र [ असेल ] तेथे घडेल;" असें मालोजीस स्पष्ट कळविलें; त्यावर मालोजीनें जाधवरावास पुन्हां असा जबाब पाठविला की, "आपण दिलेला शब्द थोरामोठ्यांचा आहे, तो व्यर्थ कसा जाईल १ आपण इतक्या लोकांसमक्ष बोलला तें अप्रमाण कसे होईल १ आम्हांस आपल्यार्थी सोयरीक अवश्य कर्तव्य आहे." मालोजीच्या ह्या जबा-