पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(२७)

बानें जाधवरावास अतीशय राग आला; मालोजीच्या उद्धट वाटणाऱ्या ह्या वर्तनानें जाधवरावाच्या अंगाचा तिळपापड उडाला, आणि त्याच संतापाच्या भरांत, त्याने मालोजी व विठोजी या उभयतांचा हिशोब चुकता करून त्यांना ताबडतोब आपल्या नौकरींतून रजा दिली; तेव्हां ते उभयतां वेरूळ येथें परत आले, व पूर्वीप्रमाणे शेती करून तेथेंच ते वास्तव्य करून राहूं लागले.

 अशा रीतीनें जाधवराव व मालोजी यांच्यामध्यें उडालेली ही पहिली चक- मक, छाँच जाधव व भोंसले या दोन सारख्याच प्रसिद्ध, शूर, कर्तबगार, करारी व करामती घरण्यांतील भावी काळांतील सतत चालू राहिलेल्या चुर- शांच्या सामन्यांतील उडालेली पहिली चकमक होय; या वेळेपासूनच हीं ॥ उभयतां घराणी एकमेकांचीं कट्टी दुष्मन बनलीं; जिजाऊचा हात शहाजीच्या हात दिला गेला, तरी त्यांचें सख्य न होतां उलट शत्रुत्व अधीक वृद्धिंगत होत गेलें; नात्याचा नाजुक संबंध डोळ्याआड होऊन शहाजीचें शौर तरवा- रीनें तोडून टाकण्यापर्यंत या शत्रुत्वाची परमावधी झाली ! मराठा मंडळांत प्रमुख, प्रबळ व प्रसिद्ध म्हणून नांवाजलेल्या जाधव घराण्यावर मात करून, आणि लुकजीचा नकशा उतरून त्याची मुलगी जिजाबाई हिचे लग्न आपला मुलगा शहाजी यांच्याशी लावून जाधवरावावरील आपल्या अपमानाचा सूड मालोजीनें बरोबर उगवून घेतला; निजामशाहा व मलिकंवर यांनी मालोजीचा पक्ष घेऊन, लुकजीच्या मानेवर तरवार ठेवून जबरदस्तीनें त्याच्याकडून जिजाईचा हात ज्या दिवशीं मालोजीच्या पोराच्या- शहाजीच्या हातांत देवविला, त्याच- वेळेपासून शिंदखेडकर जाधव व वेरूळकर भोंसले, यांच्यामधील स्पर्धा, वैम- नस्य व युद्धकलह ह्रीं ऐन रंगांत येण्यास प्रारंभ झाला; आपल्या वर्चस्वाच्या मार्गाच्या आड येणारा शहाजीचा काँटा पार उखडून नामशेष करावा, म्हणून जाधवांनी सारखा अट्टाहास केला; उलटपक्षी मराठा मंडळांत अनेक वर्षां पासून जाधवाकडे चालत आलेला अग्रपूजेचा मान, त्यांच्याकडून हिसकावून घेऊन आपल्या हाती ठेवण्याकरितां सतत पंचवीस वर्षे भोसल्यांनी खटपट केली व त्यांत ते यशस्वी झाले; व त्यामुळे जाधवांचे महत्व पूर्णपणे नष्ट झालें.