पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/४१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३०)

 मालोजी व विठोजी या उभयतांना जाधवरावानें आपल्या नौकरींतून रजा दिल्यामुळे, जरी त्यांचा व जाधवरावाचा संबंध सुटला, तरी मालोजी हा अपमानाचें दुःख विसरला नाही; त्याला अहंकारांच्या यातनाचें विस्मरण झाले नाहीं. आपले घराणे जाधवरावासारखेच उच्च असूनही आपण निर्धन, म्हणूनच जाधवरावानें आपणांस झिडकारिलें, व आपला मानभंग केला ही गोष्ट मालोजीच्या मनाला सारखी खाऊं लागली; तेजोभंगाच्या यातना कोडगे- पणानें विसरून जाण्याइतका त्याचा स्वभाव अळणी नसल्याने-बनला नसल्यानें- अशा अप्रतिष्ठेचें जिणें त्याला अत्यंत कष्टदायक वाटू लागले; आणि " करीन तर शहाजीस जाधवरावाची मुलगी जिजाऊ हीच बायको करीन " अशा छट्टो निश्चयाने पुढे कोणत्या प्रकारें खटपट करावी, या विचारांत तो मग्न होऊन गेला.

 अशाच विचारमन स्थितीत तो आपला भाऊ विठोजी यासह एका माघ महिन्यांतील पौर्णिमेच्या रात्री आपल्या शेताची राखण करण्यास गेला; तेथें गेल्यावर विठोजा निजला, व मालोजी शेताची राखण करीत बसला; मालोजी हा तुळजापूरच्या देवीचा एकनिष्ठ भक्त होता; ती देवी या वेळी त्या ठिकाणीं प्रगट झाली; व तिनें मालोजोस दर्शन देऊन असा वर दिला कीं, " तुझें. मनोरथ सिद्धीस जातील; व तुझे वंशी श्रीसांचाचा अवतार शककर्ता निर्माण होईल. यांस प्रमाण; जवळच्या वारुळांत द्रव्य आहे ते घे; तेणेंकरून तुझें कार्य होईल." अर्से म्हणून देवी अदृश्य झाली. तेव्हां मालोजीने आपल्या बंधूस जागे करून त्यास ही सर्व हकीकत सांगितली; व देवीच्या आज्ञेप्रमाणें त्यांनीं तें वारूळ खणिलें; त्यांत त्यांना पुष्कळ द्रव्य मिळालें; तें मालोजीनें श्रीगोंदें येथे शेषाप्पा नाईक पुंडे या नांवाचा एक प्रसिद्ध व साखीचा साव कार रहात असे त्याच्याकडे नेऊन ठेविलें; + व त्याच्याच मदतीनें मालोजीनें

 + ह्या वेळी मालोजीनें, " आम्हास अथवा आमच्या वंशजांस राज्यप्राप्ती झाल्यास आम्ही तुमच्या घराण्याचे उर्जित करूं " असें शेषाप्पास वचन दिले होतें; हा शेषाप्पा नाईक मोठा श्रीमान्, प्रामाणिक, एकवचनी, व सत्यवादी असून ह्यावेळेपासूनच ( इ. सन १६०१ - १६०२ च्या सुमारापासून )