पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/४२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३१)

एक हजार घोडों खरेदी केलीं; व शिलेदार बारगीर नौकरीस ठेवून त्यानें आपला इतमाम व महत्व वाढवीत नेण्यास सुरवात केली. शिवाय तो पहिल्या-


त्याच्या घराण्याचा व भोंसले घराण्याचा अगर्दी निकटचा संबंध व घरोबा जमला. या शेषाप्पाचा नातू दुसरा शेषाप्पा हा शिवाजीनें रायगड ही राज- धानी केल्यानंतर, आपल्या मुलांमाणसासह रायगड येथे येऊन राहिला होता, व रायगड येथील बाजारपेठेंत त्याचें एक दुकान होतें. या शेषाप्पाचें स्मारक म्हणून त्याच्या दुकानासमोर एक अजमार्से पांच हात लांब व एक हात रुंद असा एक चौकोनी दगड बसवून त्यावर एक नागाचें चित्र काढलेलें आहे; शिवाय किल्लयाच्या पायथ्याशी वाडी येथे त्याचा एक बाग असून त्याचें “ नाग्याबाग " हें नांव आहे. हा शेषाप्पाही आपल्या आज्याप्रमाणेच मोठा श्रीमान्, प्रामाणिक, एकवचनी, व सत्यवादी असून शिवाजीची त्याच्यावर अतीशय मेहेरनजर व विश्वास असे. मालोजीनें पहिल्या शेषाप्पास, आमचें भाग्य उदयास आल्यास आम्ही तुमचें ऊर्जित करूं, असे वचन प्रमाण दिलेलें होतें; त्यामुळे शिवाजीनें त्यास आपला जामदारखाना कामगार नेमिलें होतें, व पुढे शिवाजीस राज्याभिषेक झाला, त्यावेळीही तोच त्याच्या जामदार- खान्याचा कारभारी होता.

 श्रीगोंदें ऊर्फ चांभार गोंदे ( गोविंद या नांवाच्या एका चांभार साधूवरून या गांवास चांभार गोंदें हें नांव प्राप्त झाले आहे. ) हे तालुक्याचे ठिकाण अहमदनगर जिल्ह्यांत, अहमदनगरच्या दक्षिणेस अजमार्से बत्तीस मैलांवर व दौंड मनमाड रेल्वेच्या पिपरी या रेल्वे स्टेशनापासून रुडकेनें चार मैलांवर आहे.

 * बारगीर व शिलेदार या उभयतांच्या अर्थामध्ये महत्वाचा फरक आहे; तो थोडक्यांत असा की, स्वतःचे घोडे व हत्यारें बाळगून एखाद्या राज्य- कर्त्याच्या अथवा सरदाराच्या पदरी नौकरी करीत असेल त्यास शिलेदार असे म्हणतात; आणि नौकरीस ठेवणाऱ्या राज्यकर्त्यांच्या अथवा सरदाराच्या- नौकरीस ठेवणान्याच्या मालकांचें घोड़ें व हत्यारें जवळ बाळगून शिलेदारा- पेक्षां कमी पगारावर नौकरी करणारा त्यास बारगीर असे म्हणतात.