पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/४४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३३)

असे त्यास वाटू लागलें, व त्यानें जिजाबाई शहाजीस देण्याविषयों पुन्हां जाधवरावाकडे मागणी केली; परंतु ती जाधवरावानें अमान्य केली. तेव्हां मालोजीनें जगदेवराव निंबाळकरामार्फत मूर्तुजा निजामशहा यांजकडे त्या- बद्दल गान्हाणे केलें; तेव्हां शहानें मालोजीची कर्तबगारी ध्यानी आणून मध्यस्थी केली; व जाधवरावाकडून जिजाबाई शहाजीस देवविली; त्याप्रमाणें इ० सन १६०४ च्या एप्रील महिन्यांत शहाजी व जिजाबाई यांचे लग्न मोठ्या थाटानें झालें; व जाधवरावावर मात करून मालोजीने या लग्नसंबंधीचा आपला निश्चय अखेरीस यशस्वीपणानें सिद्धीस नेला.

 या काळांतील निजामशाहांतील राजकीय परिस्थितिही मालोजीच्या उत्कर्षास बश्याच प्रमाणानें कारणीभूत झाली होती. निजामशाहीस या वेळी काळ नष्ट आलेला होता; तें राज्य खडतर आपत्तीच्या भोवन्यांत सांपडले होते; संकटामागून संकटें येऊन त्यामुळे निजामशाहीचा पाया खिळखिळा होण्यास सुरवात झाली होती; बलिष्टानें आरंभिलेल्या स्पर्धेत निजामशाहो जगते का मरते, अशी अनिश्चित स्थिति उत्पन्न झाली होती, बादशहा अकबर हा निजामशाही नामशेष करण्याकरितां दक्षिणत चाल करून आलेला होता; शरिरांतील मुख्य व महत्त्वाची रक्तवाहनी तुटल्यानंतर जसे तें निर्बल होतें. त्याप्रमाणेच अकबरानें अहमदनगर जिकून बहादूर निजामशहा यांस ग्वाल्हेर येथे नेऊन कैदेत ठेविल्यामुळे निजामशाही राज्य निर्बल झाले होतें. शरिराचा एखादा आधारभूत अवयव कापून टाकिल्यावर ते जसें लुलें बनतें, त्या- प्रमाणेच चांदबिबीच्या मृत्यूनंतर निजामशाही निर्जिव झाली होती; आणि हा डळमळता डोलारा केव्हां एकदम कोलमंडून खाली येईल, याचा कांहींच निश्चितपणा राहिला नसून सुद्धां, मलेिकंबर हा खडकी येथें राजधानी करून निजामशाही जगविण्याकरितां मोठ्या जोराचे प्रयत्न करीत होता. अशा स्थितींत मालोजीसारख्या कर्तृत्ववान पुरुषास आपल्या पक्षाकडे ओढून घेऊन राज्यरक्षणाच्या काम त्याचा उपयोग करून घ्यावा असें त्यास वाटणें स्वाभाविक होर्ते; म्हणून त्याने आणि मुर्तुजा निजामशहानें-शहाजी व जिजाबाई यांच्या लग्नाच्या बाबतींत मध्यस्थी केली. मालोजांस पांच हजारी