पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/४५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३४)

मनसब व “ राजे" हा किताब दिला;= शिवनेरी व चाकण हे किल्ले व त्याच्या आसपासचा प्रदेश सरंजामादाखल बहाल केला; आणि पुणे व सुपें या परगण्यांची त्यास जहागीर दिली. या जहागिरीसंबंधीची यादी शिव- दिग्विजयांत दिली आहे, त्यावरून ही जहागौर पुणे, नाशिक, अहमदनगर व खानदेश, या चार जिल्ह्यांत होती, व या प्रदेशापैकी बऱ्याच भागावर त्या- वेळी मोंगलांचा अंमल बसलेला होता, असें दिसतें. तथापि तशा स्थितींतही मालोजीनें आपला मुलगा शहाजी याच्या मदतीने आपल्या जहागिरीचे मोठ्या दक्षतेनें संरक्षण केले, यावरून त्याची श्रेष्ठ कर्तृत्वशक्ति निदर्शनास येते. मालोजीनें निजामशाही दरबारच्या मदतीने जाधवरावावर आपल्या अपमानाचा डाव साधून घेतला, व शहाजी आणि जिजाबाई यांचा लग्नसंबंध घडवून आणिला. या मध्यस्तीत "कर्तबगार मनुष्य आपल्या पक्षांत ओढून


 = भोसल्यांचे अनेक कागदपत्र अलीकडे छापून प्रसिद्ध झाले आहेत ( राजवाडेकृत मराठ्यांच्या इतिहासाची साधनें, खंड १५ पहा. ) त्यावरून भोंसले घराण्याकडे“ राजे " हा किताब मालोजीच्याही पूर्वकाळापासून चालू होता, असा उल्लेख आढळतो. निरनिराळ्या लेखांकांत " लखमोजी राजे " “ सर्जाराव राजे, " " कृष्णाजी राजे " अर्शी "राजे " हा किताब धारण केलेली नाव आढळतात; आणि लेखांक ३६७ मध्यें तर बाबाजीनेंच स्वतःस " राजे" हें उपनद लाविलेले आहे. त्याप्रमाणेच बाबाजी राजे यानें इ० सन १५९७ मध्ये, मालोजी राजे यानें इ० सन १६०७ मध्यें, व संभाजी राजे यानें इ० सन १६२९ मध्यें उपाध्यायांस इनाने करून दिल्याचा व तीं मलिकंचर यानें रुजू ठेविल्याचा उल्लेख आहे. हे उपाध्ये मूळचे पुणे प्रांतांतील आरवी मुद्गल येथील राहणारे असून ते भोंसल्यांचे कुलगुरु होते; व पुढे भोंसले घराण्याचा राजकीय उत्कर्ष झाल्यानंतर तेच त्या घराण्याचे राजोपाध्ये झाले. या घराण्यांतील रामेश्वर भट उपाध्ये यांस शहाजी राजानें इ. स. १६३१मध्ये इनाम करून दिले होतें. या घराण्याचा भोसले घराण्याशी पूर्वापार व विशेष प्रेमाचा व घरोग्याचा संबंध असून हे घराणे सधन होतें; व या राजोपाध्ये मंडळीरासूनच, भोंसले प्रसंगी कर्ज वामही काढीत असत.