पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/४६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(३५)

घेणें " हा तर निजामशाही दरबाराचा प्रधान हेतू होताच; पण निजामशाहों- तील प्रसिद्ध मुत्सद्दी मलिकंबर यानें मालोजीस जहागीर म्हणून जी ठाणों, किल्ले, प्रदेश अथवा परगणे निरनिराळ्या ठिकाणी लांबवर पसरलेले व निजाम- शाही, मॉगलाई व अदिलशाही यांच्या सरहद्दीवर असलेले दिलेले होते, त्यांतील बहुतेक भाग आधींच मोगलांच्या ताब्यांत गेलेला असल्यामुळे “मेला तर मालोजी मरेल, अथवा बसला तर मोंगलावर शह बसेल," अशा दूरदृष्टोचा तितकाच महत्त्वाचा व दुसरा प्रधान हेतूही मालोजोस ही जहागीर देण्यांत असावा, हे उघड होतें. पण हे कसेंही असले तरी मालोजीनें, अशा स्थितीतही आसपासच्या राज्याशी सलोख्याचा व्यवहार ठेवून आपल्या जहागिरीचें उत्तम प्रकारें संरक्षण केलें, यावरून तर त्याच्या श्रेष्ठ कर्तृत्वशक्तीस विशेषच उज्वल स्वरूप प्राप्त होतें.

 अशा रीतीनें मालोजी हा निजामशाहीतील एक वजनदार मनसबदार बनला; ( इ. सन १६०४ ) व सतत पंधरा वर्षे त्याने या स्वकष्टार्जित वैभ वाचा मोठ्या इभ्रतीनें उपभोग घेतल्यावर तो इ० सन १६९९ मध्ये मृत्यू पावला* शिखर शिंगणापूर येथे मालोजीची छत्री आजतागायत अस्ति- त्वांत आहे.

 *मालोजी कर्धी, व कोठें मृत्यू पावला याबद्दल मतभेद आहे; आमचे मित्र रा. रा. या. म. काळे B. A.L. L. B. वकील बुलढाणा, यांस दक्षिण वन्हाडांत एक अस्सल सनद सांपडली असून तिच्यावर १५४३ हा शक (इ० सन १६२१-२२) आहे त्यावरून मालोजी हा इ० सन १६२१ मध्ये मृत्यू पावला, व त्याच वर्षाच्या अखेरीस शहाजीष मालोजीची जद्दा- गीर मिळाली, असे त्यांचे म्हणणे असून, त्यांनी भा. इ. मं. च्या अकराव्या सम्मेलनांत तशा आशयाचा एक निबंध वाचला आहे.

 परमानंद या नांवाचा एक प्रसिद्ध कवी शिवाजीच्या काळांत निर्माण झाला; त्यानें शिवाजीच्या आज्ञेवरून "शिव-भारत " हा ग्रंथ लिहिला; त्यांत असे लिहिलेलें आहे की, " बाबाजी भोंसल्यांचे मुलगे मालोजी व विठोजी हे भिमानदीच्या कांठी कांही गांवाची पाटीलकी संपादून होर्ते; तेथून