पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/४८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
परिच्छेद दुसरा.
शहाजीचें पूर्वचरित्र.

 "तुम्ही शिसोदें क्षत्रीय कुलांत निर्माण होऊन त्या कुलास अनुरूप, असा अलौकिक पराक्रम केला; व हिंदु प्रजेस यवनांच्या क्के शप्रद सत्तेतून सोडवून स्वराज्य स्थापन व स्वराज्य रक्षण करण्यासाठी भगीरथ प्रयत्न करून त्यांत (तुम्ही ) यशस्व झाला हे पाहून मला पराकाष्टेचें समाधान व धन्यता वाटत आहे. आमच्या वडिलांस (मालोजी राजे यांस ) असा दृष्टांत झाला होता कीं, तुमच्या कुलांत शककर्ता निर्माण होऊन तो हिंदु धर्माचें व हिंदु प्रजेचें यवनापासून रक्षण करील. हा दृष्टांत खरा होता, हे तुम्ही आपल्या अलौकिक कर्तृत्वाने ( आमच्या ) प्रत्ययास आणून दिले. तुमच्या ठायींच्या शौर्य- वीर्यादि अनुपम गुणांच्या योगाने आमच्या कुलाचा पुनरपि भाग्योदय झाला आहे. ( आणि ) असा प्रतापशाली पुत्र आमच्या उदरीं निर्माण झाला म्हणून आम्ही त्रैलोक्यांत धन्य झालो आहों.

- शहाजीचे धन्योद्गार.

 मालोजी मृत्यू पावला त्यावेळी शहाजीचें वय पंचवीस वर्षांचें असून, त्याचा धाकटा भाऊ शरीफजी हा बावीस वर्षांचा होता; मालोजीच्या काळांत शहाजीस बालपणापासूनच राजकीय शिक्षण मिळण्यास सुरवात झाली होती, आणि इ० सन १६०६ पासूनच शहाजीनें मालोजांबरोबर बऱ्याच मुलुख- गिया पाहिलेल्या होत्या. या काळांत मलिकंबर हा निजामशाही राज्याचा