पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/५१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४०)

निराळा. शूद्र कुणबी फावल्या वेळांत सामान्य पाइकी करी आणि मराठा कुणबी पाटील देशमूख इत्यादि लोक हवालदारापासून सरलष्करपर्यंतच्या लहानमोठ्या हुद्देदान्य करी. शूद्रांप्रमाणेच त्यांनाही मुसलमान किंवा हिंदु असा वाटेल तो धनी चाले. एक भाऊ पातशाही नौकर वं एक भाऊ शिवशाहीही नौकर असली उदाहरणे महाराष्ट्राच्या इतिहासांत शेंकडो आहेत. तात्पर्य शूद्र/प्रमाणेच ह्या मराठे लोकांतहि स्वराज्य व स्वराष्ट्र यांचा निःसीम अभिमान बाळगणारे लोक शहाजीकाल फार विरळा असत. तात्पर्य एतत्कालीन मराठे केवळ आयुधोप जीवीगण बनले होते, व स्वराष्ट्रसंरक्षक क्षत्रियत्वाचें वारें त्यांच्यांतून लुप्त झालें होतें. क्षत्रिय जे मराठे त्यांच्याप्रमाणेच ब्राह्मणांचीहि दशा होती. मुसलमान किंवा हिंदु अशा वाटेल त्या धन्याची सेवा करण्यांत हे सारखेच राजी असत. मराठे व ब्राह्मण यांना यवनाची सेवा मनापासून आवडत असे, असा मात्र ह्या राजीपणाचा अर्थ केल्यास ती चूक होईल. अनन्यगतिक म्हणून हे लोक यवनसेवा पतकरीत स्वतंत्र हिंदु राज्य स्थापण्याची शक्यता नसल्यामुळे विजयनगरच्या राजघराण्याचा अस्त झाल्यावर, यवनसेवा केल्यावांचून ह्या लोकांना गत्यंतर राहिले नव्हते. स्वतंत्र हिंदु राज्य स्थापण्याची शक्यता ह्या मराठा किंवा ब्राह्मण लोकांत नसण्याचें कारण असे होते की मराठा क्षत्रीय व ब्राह्मण यांची लोकसंख्या शूद्र कुणब्यांच्या लोकसंख्येहून फारच फार कमी होती. सामान्यतः हजार पांचशे वस्तीच्या गांवांत एखाद दुसरें ब्राह्मणाचें घर व एखाद दुसरें पाटलाचें घर असे. म्हणजे दहा पांच ब्राह्मणांची व दहा पांच मराठ्यांचीं माणसें असत. कित्येक दहा दहा पांच पांच गांवांचे गट असे असत की त्या सायांत मिळून एखादें ब्राह्मणाचें व दोन अडीच पाटलांची घरे असत. मिळून सर्व राष्ट्रांत एका ब्राह्मणास दोन मराठे व पंचवीस कुणबी असें | सरासरी प्रमाण पडे; ब्राह्मणांत किंवा क्षत्रियांत जो स्वराज्यविषयक किंवा स्वधर्मविषयक ईर्ष्या, आकांक्षा व अभिमान संभाव्य असे तो शूद्रांत अद्याप जागृतहि झाला नव्हता. निरवसितत्वांतून अनिरवसितत्वांत येऊन म्हणजे अस्पृ श्यत्वांतून स्पृश्यत्वांत येऊन व वनचरत्वांतून प्रामचरत्वांत नांदून पोटाकरितां कोणाची पाइकी करण्याइतकी महत्त्वाकांक्षा शुद्रांत उद्भवली होती. हिंदुत्वा-