पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/५५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४४)

निरोपानें सोंपविलें. मूर्तिजाच्या अंतकाळी शहाजी निजामशाहीत नव्हता, ही बाब लक्षांत घेतली म्हणजे शहाजीनें शाहाचा केवढा विश्वास संपादिला होता, ह्या विधानाच्या सिध्यर्थ ह्याहून जास्त पुरावा देण्याची जरुरी नाही. "

 "राजकीय दृष्टया देशांतील लोकस्थिति व दरबारांतील पक्षस्थिति वर्णिल्यानंतर रियासतीच्या भोवतालील राजकीय परिस्थिति सांगणे सोईस्कर होतें. शहाजीच्या उमेदवारीच्या काळी, निजामशाहीच्या शेजाराला एकंदर चार शाह्या होत्या; उत्तरेस दिल्लीची प्रचंड व विस्तीर्ण मोंगलाई, व दक्षिणेस विजापूरची आदिलशाही, बेदरची बेरीदशाही व गोवळकोंडघाची कुतुबशाही. पैको बेदरची बेरीदशाही मरणोन्मुख झालो असून कुतुबशाहांहून आदिलशाही व आदिलशाहोहून मोंगलाई एकाहून एक बालेष्ट होत्या. सर्वांत मोंगलाई अत्यंत बलिष्ट असून, तिचा रोख दक्षिणेतील सान्या शाह्या खाऊन टाकण्याचा स्पष्ट व सर्वजनदृढ होता. दिल्लीच्या मोंगलांनी निजामशाहीचे मोठमोठे लचके तोडिले असून राजू, मलिकंबर व मालोजी यांच्या कर्तबगारीने ती शाही कांहीं काळ जिवंत राहिली होती; आणि निजामशाही वारली तर बाकीच्या शाह्या निजामशाहीचे अनुकरण करितील असा रंग दिसत होता. तत्रापि निजाम- शाही व आदिलशाही यांच्या आपसांत लढाया चालूच होत्या. भोवतालची राजकीय परिस्थिति है। असल्या प्रकारची होती.

 " खुद्द निजामशाहीतील अंतस्थ राजकीय स्थिती पाहिली तर तीही वाखाणण्यासारखी नव्हती. मुख्य शहा जो मूर्तिजा उर्फ बुन्हाणशहा तो दुर्बल असून मोंगलांनी दिलेल्या पंचवीस वर्षांच्या माराने त्याची व त्याच्या बरो बर रियासतीची इज्जत उतरून गेलेली होती. मूर्तिजाच्या पहिल्या अमदा- नीत राजू व अंबर ह्या दोघां दक्षिणी व परदेशी पुढान्यांनी राज्याचा पूर्व व पश्चिम भाग अनुक्रमें वांटून घेतला होता; व मूर्तिजाला आवश्याच्या किल्लाभोंवतील कांहीं खेडर्डी निर्वाहार्थ लावून दिली होतीं ! मूर्तिजाच्या उत्तर आमदानीत मलिकनें राजूला जमिनदोस्त करून सर्व सत्ता आपल्या एकाट्याच्या हातांत एकवटविली होती; व शहाला तो कस्पटासमान लेखीत होता. शेवटीं राजूचा घरचा कांटा काढून टाकिल्यावर मोंगलाशों, व आदिल- शहार्शी झगडण्यांत अंवर गुंतला होता. अशा आणीबाणीच्या वेळी शहाजी