पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/५६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४५)

राजा भोंसला तत्कालीन राजकीय आखाड्यांत उमेदीनें व ताज्या दमानें अवतीर्ण झाला. शहाजी आपला वाली होईल, व म्हाताच्या अंबराच्या प्राण घेणाया मगरमिठींतून आपणांस सोडवल अशा आशेनें मूर्तिजाचें होतें तेवढें सर्व वजन शहाजीच्या पाठीला होतें. त्या वजनाचा पूर्ण उपयोग करून घेऊन, निजामशाहीची पडती इमारत शहाजीनें कांहीं काळ सांवरून घरिलीं, आणि इतकेंही करून ती कायमची मोडल्यावर, स्वतःचें सामर्म्य वाढवून आदिलशाही व मोंगलाई यांची हाडें खिळखिळी करण्याचा मार्ग आपला प्रतापी मुलगा जो शिवाजी, त्याला मोकळा करून दिला. " निजामशाही राज्याच्या व निजामशहाच्या पडत्या काळांतील स्थितीचें स्वरूप थोडक्यांत वर लिहिल्याप्रमाणे आहे.

 या काळापूर्वी अजमासें पंचवीस वर्षांपासून निजामशाही राज्याची राजकीय स्थिती जी अतिशय अस्थीर व थोक्याची होत गेलेली होती ती, यादी काळांत तशीच कायम होती; आणि बहादूर निजामशहा याची अकब- रानें ग्वाल्हेर येथील किल्लघांत प्रतिबंधांत रवानगी केल्यानंतर, मिआन राजू व तो फुटून मोंगलास मिळाल्यानंतर मलिकंबर व शहाजो है उभयतां निजामशाई जगविण्याकरितां अश्रांत परिश्रम घेत होते; मलिकंबरनें मोग- लांच्या ताब्यांत गेलेला निजामशाही प्रदेश पुन्हां आपल्या ताब्यांत मिळ- विण्याचा प्रयत्न आरंभिला; विजापूरकर इब्राहीम आदिलशहाचें मन वळवून त्यास आपल्या पक्षांत मिळवून घेतलें; आणि त्याची मदत मिळवून व शहाजी व लुकजी जाधवराव यांना बरोबर घेऊन मलिकंबरनें मोठ्या धडाडीनें मोंग- लाई सुभेदाराचें मुख्य ठाणें जें बन्हाणपूर, त्या शहरास वेढा दिला; वेळी तेथील मोंगली सैन्यानें आपली शिकस्त केली, परंतु एकवटलेल्या शत्रु- सैन्यापुढे त्याचा निभाव लागला नाहीं; व अखेरीस मलिकंबरनें मोंगलांच्या ताब्यांत गेलेला निजामशाही प्रदेश पुन्हां परत मिळविला; या युद्धांत शहा- जीनें अतिशय पराक्रम गाजविला, व त्यामुळे, मालोजीच्या मृत्यूनंतर शहाजी जहागिरीचा मालक झाला न झाला तोंच त्याचें शौर्य, पराक्रम व कर्तृत्व हीं मलिकंबर, मोंगल व अदिलशहा यांच्या नजरेस येऊन त्याचा लौकिकही पुष्कळच प्रमाणांत वृद्धिंगत झाला.