पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/६०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(४९)

आपल्या इच्छेविरुद्ध आपला झालेला जांवई शहाजी याच्यापुढे अश रीतीनें मान वांकविणे त्याला अत्यंत अपमानास्पद वाटू लागले; त्यामुळे शहाजीविषयी त्याचा द्वेष दुणावला; निजामशाही राज्याविषयींचें त्याचें प्रेम नष्ट झालें, तो - आपल्या कित्येक नातलग व इतर मराठे सरदारांसह- मोंगलांना जाऊन मिळाला, व त्याने निजामशाही नष्ट करण्याच्या मोंग- लांच्या प्रयत्नांत त्यांना मदत केली, असेंच निदर्शनास येतें. *


 * "शके १५४७ क्रोधी नाम संवतसरे फसलीसन १०३५ या साली निजाम मूर्तुजा पादशहा हे मृत्यू पावले. त्यांनी राज्य केलें वर्षे ३२. निजाम मूर्तिजा पादशाहा यांचे पुत्र लहान होते. ते समई शहाजी राजे निजाम मूर्तिजा पादशहा यांचे पुत्रास आपण त्यास मांडीवर घेऊन तक्तावर बसू लागले. तेव्हां पादशहा जादीची व त्याचे पुत्राची शहाजी राजे याजवर कमाल मेहेरबानी दिवसे दिवस फारच जाहली व पादशाहा जादीचे मर्जीनें फारच वागू लागले व फौजेचे वगैरे काम पाहू लागले. तेव्हां पादशहाजादीचे व त्याचे पुलाची शहाजी राजे याजवर कमाल मेहेरबानी दिवसेदिवस फारच जहाली व पादशहाजादांचे मर्जीनें फारच वागूं लागले व फौजेचें वगैरे काम पाहूं लागले. तेव्हां पादशहाजादीचे व त्यांचे पुत्राचे हुकुमावरून लुखजी जाधवराव वजीर याजवर हुकमत करू लागले. तेव्हां उभयतांचें वांकडे येऊन दिवसेंदिवस द्वेष वाढू लागला. कांहीं दिवस वजीरीचें काम आपण जातीने शहाजी राजे करू लागले. ते समई लखूजी जाधव वजीर यांनी मनांत आणिलें की आम्ही पादशहाचे वजीर असता शहाजी राजे पादशहाचे पुत्रास मांडीवर घेऊन तक्तावर बसतात आणि आम्हास पाद- शहाचे मुलास खुरनुसा करावा लागतो यामुळे आमचा अपमान होतो ही गोष्ट जाधवराव वजीर याणी आपले मनांत आणून हैं कांहीं चांगले झाले नाहीं, म्हणोन इराद्यानें शहाजी राजे याजबरोबर वागू लागले " ( मराठी दफ्तर, रुमाल पहिला; पहा.)

 या बाबतीत तंजावरच्या शिलालेखांत ( इतिहास मंजरी; पान १९ पहा ) व राधामाधव विलासचंपू या ग्रंथांत अशी हककत दिली आहे की शहाज-