पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/६८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(५७)

 या वेळीं मलिकंबर हा अजमार्से ऐश वर्षांचा असून त्याच्या वृद्धापकाला- मुळें, जरी तो निजामशाही सैन्याचा मुख्य सेनापति होता तरी, युद्धाची सर्व


व त्यानें या बाईचा गौरव करून तिला " पंडिता " व " रायबागीण ( स्त्रीशार्दूल; तंजावर येथील बृहदीश्वर शिलालेखांत या शूर स्खौला राजव्याघ्री " असे म्हटलेलें आहे. ) असे दोन किताब दिले; शाएस्ते- खानाच्या स्वारीच्या वेळीं, या बाईनें, औरंगझेबाच्या हुकुमाने शिवाजीच्या प्रदेशांत बराच धुमाकूळ उडविला असून, या बाईचें व शिवाजीचें इ. सन १६७० मध्यें उमरखिंडीत युद्ध झाले असल्याबद्दल बखरींत उल्लेख आहे.

 या बाईसंबंधी साग्र हककित, व या घराण्याची अधीक माहिती, पुढें शिवाजीच्या हकीकर्तीत येणार असल्यामुळे त्या संबंधी या ठिकाणी अधीक उल्लेख केला नाहीं.

 खुलासा- वाशीम हे तालुक्याचें गांव वन्हाडांत अकोले जिल्ह्यांत अकोल्या पासून सडकेनें अजमायें ५१ मैलावर आहे. उमरखेड हे यवतमाळ जिल्ह्यांत पुसद तालुक्यांत आहे, व जवळच उमरखिंड आहे. जी. आय. पी. रेलवेच्या नागपूर लाईनीवरील मूर्तिजापूरपासून यवतमाळपर्यंत जो फांटा गेला आहे, त्यावर दारव्हा म्हणून एक स्टेशन आहे; तेथून दिग्रस, पुसद, उमरखेड व माहूर असा रस्ता गेलेला आहे. दारव्हा येथून दिग्रस अजमार्से १८, पुढे घुसद १८, पुढे उमरखेड २०, व तेथून निजामच्या हद्दीत २० मैलांच्या आंतच माहूर हे ठिकाण आहे. माहूर है श्रीगुरुदेवदत्त महाराजांचें निद्रास्थान असून तें एक तीर्थयात्रेचें, महत्वाचें प्रसिद्ध व साक्षात्कारी देवस्थान आहे. निजामच्या राज्याची हद्द व वाडची हद्द यांच्यामध्ये उमरखिंड आहे; उमरखेड येथें प्रसिद्ध गोचर स्वामांचा मठ असून तें व मेहकर हीं पैनगंगानदीच्या कांठी आहेत; शिंदखेड मेहकर तालुक्यांत असून, वाशीम व मेहकर येथें श्रीबालाजी महाराजांची प्रसिद्ध देवालयें आहेत; व हे दोन्हींहि तालुके अनुक्रमें अकोलें व बुलढाणा जिल्ह्यांत असून तें निजामच्या राज्याच्या सरहद्दीवर आहेत; शिरपूर हैं अकोले-वाशीम सडकेवर, अकोल्यापासून अजमायें ४५ मैलांवर च वाशीमपासून ६ मैलांवर असून येथे अंतरिक्ष पार्श्वनाथाची मूर्ति आहे;