पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/७२

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ६१ )

 मूर्तुजा निजामशहा हा हलक्या कानाचा, अस्थीर मनाचा, अशाश्वत बुद्धांचा व दुबळ्या कर्तृत्वाचा असा 'नालायक राज्यकर्ता होता; व मलिकंबरच्या मनांत शहाजीविषयों वैमनस्य उत्पन्न झालेलें होतें; त्यामुळे मलिकंबरच्या बगल- बच्च्यांचें, दोस्त, भगत व हस्तकांचें, व शहाजीच्या हितशत्रूंचे चांगलेच फावून त्यांनी शहाजीविरुद्ध खटपटी आरंभिल्या; आणि जरी भातवडी येथील युद्धांत व नवरसपूरवरील मोहिमेंत शहाजीनें पराक्रम गाजवून उत्तम कामगिरी केली होती, तरी त्यांनीं मूर्तुजाशाहाच्या मनांत असे भरवून दिलें कीं, " भातवडांच्या युद्धांत व नवरसपूर वरील मोहिमेंत वास्तवीकरित्या शहाजीनें विशेष पराक्रम केला नसून खरें कर्तृत्व व खरा पराक्रम खेळोजी राजे भोंसलें यानेंच केलेला आहे; " अर्थात ही गोष्ट शहास खरी वाटली, व त्यानें नवरसपूरच्या मोहिमेवरून विजयी निजामशाही सैन्य परत आल्यावर शहा-


यांस गाण्याचा फार नाद होता; म्हणून त्यानें इल्लीं ज्या ठिकाणीं तोखें हा गांव आहे, तेथें इ० सन १५८८ मध्ये “ संगित महाल " व नारी महाल " असे दोन महाल बांधिले व त्यांस त्यानें अनुक्रमें नवरस महाल व " सुंदर महाल " अशीं नांवें ठेविलीं. यापैकी " सुंदर महाल हा त्याची सुंदर या नांवाची राणी होती तिच्याकरितां त्यानें बांधिला होता; या बादशदास गाण्याचा अतिशय नाद असल्यानें त्याच्याजवळ पुष्कळ गवई होते, व त्यानें त्यांना चांगली वेतनें करून देऊन आपल्या आश्रयाला ठेविले होतें; व त्या लोकांस राहण्याकरितां म्हणून तेथेंच आपला वजीर शहान- वाजखान याच्या देखरेखीखालीं इ० सन १५९८ मध्ये नवरसपूर हे गांव वसविलें. विजापूर येथील प्रसिद्ध अवलिया मिरानी शमशुल ओशाख याच्या वंशांतील पाँचवा पुरुष हजरत मौलाली हुसेनी यांस दिल्लीचा बादशाहा महं- मदशहा यानें इ० सन १७३३ मध्ये बोबलाद, कोरहाल, व उपरीनिर्दिष्ट तोरखें हा गांव इनाम दिला तो आज तागायत त्याच्या वंशजाकडे चालत आलेला आहे. मलिंकंबर याने नवरसपूर हैं गांव जाळून पौळून खाक केल्या नंतर लवकरच इब्राहीम अदिलशहा मृत्यू पावला; व त्या दिवसापासून तो हा कालपर्यंत हे गांव अगदी वैराण होऊन राहिले आहे.