पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/७३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६२)

जीला न गौरवितां खेळोजीचाच विशेष गौरव केला; त्यामुळे शहाजीस अति- शय वाईट वाटलें; तो खिन्न झाला; जाधवरावाप्रमाणेंच मलिंकंबर, खेळोजी च प्रत्यक्ष मूर्तुजा निजामशहा हे आतां आपले शत्रू झाले, असे त्याच्या मनानें पूर्णपणे घेतले; आता यापुढे निजामशाहीत राहणे धोक्याचें आहे, अशी त्याची खात्री झाली; आणि स्वतःच्या सुरक्षिततेचा मार्ग धुंडाळण्यास त्याने सुरवात केली.

 शहाजीचे मन निजामशाहीविषयीं विटले आहे, ही हकीकत विजापूर दरबारला समजल्यावर, शहाजी सारखा शूर सरदार आपल्या पक्षाला लाभावा म्हणून आदिलशाहीच्या सूत्रचालकांनी गुप्तपणे पुष्कळ खटपट केली; शहा- जोशी संधान बांधिलें; व त्यांच्या खटपटीस यश येऊन शहाजी हा आपल्या सैन्यासह, निजामशाही सोडून ( इ० सन १६२५ च्या अखेरीस ) अदिल- शहास जाऊन मिळाला, व नंतर लवकरच ( इ० सन १६२६ मध्यें ) शहा- जीस अदिलशहाकडून त्याच्या इतमामास साजेल अशी मनसब व अक्कलकोट वगैरे परगणे जहागिरीदाखल मिळाले.

 शहाजी हा अदिलशाही नौकरींत दाखल झाल्यानंतर, भातवडी, सोलापूर व नवरसपूर येथील अपमानाचा सूड उगविण्याची इब्राहीम अदिलशहा यानें तयारी केली, व निजामशाही राज्यांतील धारूरच्या प्रांतावर स्वारी करून तो प्रांत त्याने आपल्या हस्तगत करून घेतला. व शहाजीनें आपल्या पुणे व जुन्नर कडील जहागिरीत राहून तिकडून निजामशाहीला शह द्यावा, असा त्यास हुकूम देऊन त्याची तिकडे रवानगी केली; व त्याप्रमाणे तो जुन्नर प्रांती जाऊन राहिला; तथापि जमल्यास आपण पुन्हां निजामशाहीत जावें, अशी शहाजीची इच्छा होती; म्हणून त्यानें मूर्तुजा बुदाणशद्दाच्या आईकडे*


 *हिचें नांव बेगमसाहेब है असून, तिला मूर्तुजा बुन्हाणशहा व दरबारी लोक “मा साहेब" म्हणत असत; व तिचा शब्द्व मूर्तुजा कुराणाप्रमाणे पूज्य मानीत असे; इतकेच नाही तर कधीं कधीं राजपत्रांवर तिची निशाणी मथ- ळ्यावर लिहिण्यांत तो भूषण मानीत असे.