पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/७५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६४)

आई या उभयतांना आपणांबरोबर घेऊन कल्याणजवळील माहुली या किल्लयाच्या आश्रयास गेला. तेथें युद्धसामुगी भरून घेतली व तेथूनच तो निजामशाही राज्याचा कारभार पाहू लागला.


 *माहुलीचा प्रसिद्ध डोंगरी किल्ला ठाणे जिल्ह्यांत कासारा घाटांत शहा- पूर तालुक्यांत शहापूरच्या वायव्येस सुमारे चार मैलांवर " माहुली या नांवाच्या डोंगरावर बांधिलेला आहे. या डोंगराची उंची २८२५ फूट असून त्याच्या दक्षिणेकडील टोंकास सुमारे ८०० फूट खोल अशी एक भयंकर दरी आहे. माहुलीच्या डोंगरावर तीन शिखराला तीन किल्ले आहेत; त्यापैकी उत्तरेकडील शिखराला पळसगड, मध्य शिखराला माहुली व दक्षिणेकडील शिखराला भंडारगड असे म्हणतात. यांतील माहुलीचा किल्ला सर्वांत मजबूत व मोठा आहे; व त्याची लांबीरुंदी बहुतेक सारखीच अजमार्से अर्धा मैलाची आहे. या किल्लथाला पाण्याचा पुरवठा उत्तम असून आंतील जमीनही उत्तम आहे. हा किल्ला अतीशय अवघड जाग असून त्याची चढण फारच अवघड, आणि माथ्याजवळील चढण तर एका भयंकर दरीतूनच आहे; व तिच्या माथ्याशीं एक मजबूत दरवाजा आहे; व त्याच्या दोन्ही बाजूस दोन व माथ्यावर एक असे तीन बुरूज असून दरवाजाच्या भिंती बाहेरच्या बाजूस थेट तुटलेल्या कड्यापर्यंत वाढवीत नेलेल्या आहेत; शिवाय दरवाजाच्या जरा पलीकडे टँकडीच्या माथ्यावर एका उंचवट्याच्या जागेवर एक बुरूज आहे, त्यास परथळगड असे म्हणतात. माहुलीच्या किल्लयावरून उत्तरेस पळसगड व दक्षिणेस भंडारगड येथे जाण्यास मार्ग असून खालील सपाट प्रदेशावरून फक्त पळसगडावरच जातां येतें. माहुलीच्या किल्लघाबर जाण्याचा जुना रस्ता पूर्वेच्या बाजूस माची या नांवाच्या एका खेड्यावरून होता; त्याचा दरवाजा एका तुटलेल्या दरीच्या तोंडाशी असून, दरीच्या माथ्यावर दरवाज्याच्या संरक्षणाकरितां एक भिंत उभारली असून, ती मोठी मजबूत व आजतागायत अस्तित्वांत आहे.

 योगायोग कसे चमत्कारिक येतात-मानवी प्राण्याच्या सामाजिक स्थित्यं तराबरोबरच त्याचें मानसिक स्थित्यंतर ही कसे होत जातें-याचें " माहुलीचा