पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/७६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(६५)

 शहाजी हा राजमाता व बालराजा मूर्तुजानिजामशहा यांच्यासह माहुली येथील किल्लयाच्या आश्रयास गेल्यावर, मोंगल सैन्याने जाधवरावाच्या मदतीने त्या किल्लयास लागलीच वेढा घातला. तथापि शहाजीनें न डगमगतां किल्ला लढविण्याचा निश्चय केला. मोंगली फौज किल्ला हस्तगत करून घेण्याकरितां त्या ठिकाणी अधीक अधीक जमू लागली. तरी सुद्धां हिंमत न सोडतां, कच न खातां, मोंगला सैन्यास कोणत्याही प्रकारें दाद न देत, शहाजी त्या सैन्याशीं सारखा झगडत राहिला. मोंगली सैन्याची रसद मारून त्यानें त्या सैन्यास अतीशय हैराण केलें; सारख्या चिकाटीनें सतत सात महिने किल्ला लढविला, आणखीहि कित्येक महिने तसाच लढवूं अशा निश्चयानें तो झगडत राहिला; आणि मोंगलांच्या भेदनीतीस यश आलें नसतें, तर आणखी कित्येक महिने त्याने तो किल्ला तशाच चिकाटीनें खात्रीनेंच लढविला असता. परंतु मोंगलांची भेदनीति यशस्वी झाली ! जाधवरावाच्या प्रयत्नास यश आलें ! आणि शहाजीचें " मनोराज्य " जागच्याजागी लयास गेलें ! जाधवरावानें मूर्तुजा निजामशहाच्या आईशीं गुप्तपणानें मिलाफाचें बोलणें लाविलें व आपण


किल्ला " हे एक महत्वाचे व लक्षात ठेवण्यासारखें उदाहरण आहे. बादशहा शहाजहान, हा शहाजादा खुर्रम असतांना त्याने आपल्या वडिलां- विरुद्ध - बादशहा जहांगीर याच्या विरुद्ध बंड करून तो दक्षिणेत आला; त्यावेळी त्याने आपली बायकामुलें, व जडजवाहीर गोपाळदास या नांवाच्या आपल्या एका शूर व विश्वासू रजपूत सरदाराच्या स्वाधीन करून त्यांना याच किल्लयावर ठेविलें होतें; व पुढे जहांगीर मृत्यू पावल्यावर शहाजहान बादशहा झाला तेव्हां त्यानें गोपाळदासाचा मुलगा मनोहरदास यांस माहु- लाँचा किल्लेदार नेमिलें होतें. ( R. A. S. Journal March 1915 पहा.) परंतु शहाजहान प्रमाणेच या वेळी निजामशाही राज्यकर्ता मूर्तुजा- शहा, राजमाता व शहाजी यांनी त्याच किल्ल्याचा आश्रय घेतला, त्यावेळी तोच शहाजहान माहुलीचा किल्ला मोठ्या अट्टाहासानें हस्तगत करून घेतांना आपली पूर्वस्थिती पूर्णपणे विसरून गेला ।