पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/८१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७०)

ती प्रसूत झाली व तिला मुलगा झाला.* तोच मराठी साम्राज्य संस्था पक छत्रपति शिवाजी हा होय.

 शहाजाने निंबाळकरामार्फत अदिलशाही राज्यांत अगोदरपासूनच संधान जमवून ठेविलें होतें; शिवाय अदिलशाही राज्याचा कारभारी मुरार जगदेव, व सेनापती रणदुल्लाखान यांच्याकडे मुद्दाम आपल्या विश्वासांतील बाळकृष्णपंत हणमंते यांस पाठवून त्या उभयतांशीं सख्यत्वाचं बोलणे सुरू केले होतें तथापि यावेळी शहाजी व अदिलशहा या परस्परांचें हेतू, परस्परांशीं संख्य करण्यांत अगदीच भिन्न होते. शहांजीचा विचार अदिलशाही सैन्याची मदत घेऊन निजामशाही जगवावी, असा होता; आणि आदिलशहास शहाजीची कर्तबगारी माहीत असल्यानें त्याने त्यास निजामशाही जगविण्याकरितां जरी मदत घेण्यानें कबूल केल होतें तरी, निजामशाही न जगली तर शहाजीच्याच मदतीनें त्या राज्यांतील जितका प्रदेश आपणांस काबीज करून घेता येईल तितका ध्यावा, असा श हाचा हेतू होता. आणि त्याप्रमाणे त्याने आपले कांहीं सैन्य शहाजीच्या मद- तीस दिलेही होतें.

 मध्यंतरी निजामशाही राज्यांतील भानगडी पुन्हां अधिकच जोरति आल्या; आणि मलिकंबरचा मुलगा फत्तेखान हां निजामशाही राज्याचा सूत्रचालक बनला. परंतु त्यांच्यांत मलिकंबराची कर्तृत्वशक्ती अथवा राजधोरण नव्हतें; शिवाय तो गर्विष्ठ व क्रूर होता; आणि राज्यांतील सरदार मंडळीला प्रेमानें वागवून, व आपल्या दाबांत ठेवून, राजयंत्र सुरळीत व सुव्यवस्थितपणे चाल- विण्याची त्याच्या ठायी पात्रता नव्हती. फत्तेखान अधिकारस्थानापन्न झाल्या- वर त्यानें कांही काळ मोगल सरदार खानजहान लोदी याच्याशी युद्ध चाल- विले; परंतु त्यांत त्यास यश मिळण्याची आशा न वाटल्याने त्याने लोदीशीं


 * शिवाजीची जन्मतिथी शके १५५१ फाल्गुन वद्य तृतीया ( ताo १९ फेब्रुवारी इ० सन १६३० ) ही असल्याबद्दल एक नवा शोध लागला आहे; परंतु त्याबद्दल अद्याप एकमत नसल्यामुळे, आम्ही या ठिकाणी या बाबतीचा फक्फ उल्लेखच काय तो केला आहे.