पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/८४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७३)

नातू वसंतराव व दुसरे कित्येक आप्त इष्ट मारले गेले. ही अनर्थाची बातमी किल्लयाबाहेर जगदेवराव उतरला होता, त्यास कळतांच तो व त्याचा मुलगा बहादूरजी हे तात्काळ शिंदखेड येथे पळून गेले; मार्गे लष्कारांत लखूजीची बायको (जिजाबाईची माता ) म्हाळसाबाई उर्फ गिरजाबाई ही एकटीच होती; तिला ही बातमी समजल्या बरोबर ती न डगमगतो, तळावर असलेल्या मंडळीसह शत्रुसैन्याच्या देखत देखत शिंदखेड येथें निघून गेली. ही कत्तल शके १५५२ श्रावण शुद्ध १५ म्हणजे इ० सन १६३० च्या आगष्ट महिन्यांत झाली. ( भा० इ० सं० मंडळ त्रैमासिक वर्ष १ ले अंक पहिला, व जेधे यांची शकावली पहा.) त्यानंतर लखूजीच्या ( याचें सर्व नांव लुकजी कुफजी यादव असे असल्याचें " मराठ्यांच्या इतिहासाची साधनें " खंड १५ " शिवकालीन घराण्यांचे पत्रव्यवहार " लेखांक ३ पान १३ वर लिहिलेले आहे. ) सरदारकीस ओरस वारस न राहिल्यामुळे मोंगल बादशाहानें ती सरदारी त्याचा भाऊ जगदेवराव यांस दिली; व त्याच वेळीं जगदेवरावाचा मुलगा बहादूरजी व नातू मानसिंगराव यांसही मोंगली फौजेंत निरनिराळ्या मनसबा मिळाल्या. तथापि " मराठे कुळांचे इतिहास " भाग पहिला यांत या घराण्यासंबंधी जी हकीगत दिली आहे त्यावरून असे दिसतें कीं लखूजीस वारस होता; हा वारस म्हणजे लखूजीचा नातू व अचलोजीचा मुलगा सुजनसिंग उर्फ संताजी हा होय; म्हणजे लखूजीचा मुलगा अचलोजी,


दांथी - अब ऐसा कौन षख्स है के दौलतखान ये सर्कारी और रियासतका बंदोबस्त करे. "
"

" बसातीन-इ-सुलातीन. "

याने तारीख बादशहाने विजापूर. "

  यावरून जाधवरावाची केवढी योग्यता होती, हें निदर्शनास येतें; माहूरकर उदाजी राजे व याकूनखान हे उभयतो हिंदु मुसलमान सरदार लखुजी जाधवाची योग्यता जाणून होते; व लखुजीच्या मृत्यूनंतर निजाम- शाहीचे व दौलतांचे संरक्षण करण्यायोग्य असा त्याच्या तोडीचा बुद्रुक सरदार कोणीही नव्हता, है वरील विवेचनावरून उघड होतें.