पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/८५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(७४)

अचलोजीचा सुजनसिंग उर्फ संताजी; संताजीचा शंभूसिंग व त्याचा मुलगा म्हणजे भावी प्रसिद्ध सरदार धनाजी जाधव, अशी वंशपरंपरा असल्याचा उल्लेख आढळतो. या घराण्यांतील धनाजी जाधव वगैरे मंडळी भावी काळांत जरी मराठ्यांना येऊन मिळाली तरी सर्वसाधारणतः लखूजी जाधवाचा व त्याच्या आप्तस्वकीयांचा निजामशाहानें विश्वासघातानें नाश केला, त्या वेळे- पासून हें जाधवाचें घराणे अखेरपर्यंत मोंगलांचीच नौकरी करून राहिले. x


x विशेष खुलाशाची टीपः-

 श्री छत्रपति शिवाजीच्या काळांत लुकजी जाधवराव याचा नातू मोंगला- तर्फे नाशीक - त्रिंबकच्या ठाण्यावर ठाणेदार होता; त्यावर इ० सन १६७२ मध्ये शिवाजीचा सरदार पेशवा मोरो लिंक पिंगळे यानें हल्ला करून, त्यांत त्याचा पूर्ण पराभव करून, त्यांस कैद केले होतें.

 लुकजी मृत्यु पावला त्यावेळी तो ८० वर्षांचा होता; लुकजीच्या मृत्यु - नंतर इ. सन १६३४ - १६३५ मध्यें, जिजाबाईची आई म्हाळसाबाई व नातू सुजनसिंह उर्फ संताजी वगैरे मंडळी, जिजाबाईजवळ पुणे प्रांती राह- ण्यास आली, व तिकडेसच स्थाइक राहिली आणि त्यांनी शिवाजीच्या राजकारणीत त्यास साह्य करीत राहून आपले सर्व आयुष्य तिकडेच खर्च केलें,

 लुकजीचा भाऊ जगदेवराव हाही लुकजी प्रमाणेच विशेष पराक्रमी व कर्तबगार होता. मोंगली सैन्यानें निजामशाहीविरुद्ध चालविलेल्या अखेरच्या युद्धांत त्यानें मोठाच पराक्रम गाजविला; त्यावरून लुकर्जाच्या वेळची बावन चावड्यांची देशमुखो, जगदेवरावाच्या नांवानें करून देण्यांत आली; व त्या शिवाय फोजेच्या खर्चाकरितां स्वतंत्र जहागीरही तोडून देण्यांत आली. त्यापैकी कांही जहागीर निजामचे राज्यांत त्याच्या वंशजांकडे अद्याप चालू आहे; शिवाय याच वेळी त्यास " रुस्तुमराव " हा किताबही मोंगलाकडून मिळाला, जगदेवराव हा इ० सन १६५० मध्यें दिल्ली येथें मृत्यु पावला; जगदेवरावांनतर त्याचें घराणे दिल्ली येथे राहिलें; व " रुस्तुमराव " हा किताबही त्याच्या वंशजाकडे चालू राहिला. याच घराण्यांतील मानसिंग रुस्तुमराव जाधव याची