पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/९१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ८० )

बादशहाकडून सरंजाम मिळाल्यानंतर बादशहाच्या हुकुमाप्रमाणे तो प्रथम जुन्नर मागून संगमनेर व नंतर बायझापूर येथे आपल्या जहागिरीत राहिला; व नंतर पावसाळ्यांत त्याने आपली छावणी नाशक येथें ठेविली. ( इ. सन १६३१ ) त्यावेळी श्रीसमर्थ रामदास स्वामी पंचवर्टीत वास्तव्यास असून स्वामींचे बारा वर्षांचें अनुष्ठान बहुतेक पूर्ण होत आलेलें होतें; अर्थात् अशा प्रसिद्ध साधुपुरुषाची शहाजीनें या वेळी भेट घेतली असावी, असें अनुमान करण्यास जागा राहते.

 यावेळी दक्षिण प्रांतांत मोठा भयंकर दुष्काळ पडला; ( सन १६३० ) इ० सन १६२९ मध्येच पाऊस न पडल्याने ते वर्ष लोकांनी कसे तरी कष्टानें पार पाडिलें; परंतु १६३० च्या दुष्काळानें तर लोकांच्या आपत्ती चा कडेलोटच केला | लोकांची अन्नान्न दशा झाली ! लाखों लोकांचा दुष्काळानें संहार उडाला ! लाखों जनावरें कालमुखी पडलीं 1 जगलेल्या लोकांपकी पुष्कळांनी आपले प्राण जगविण्याकरितां निवडुंगेसुद्धां भक्षण केलीं ! त्यांतच पुन्हां पटकीशी सांथ उद्भवला व त्यामुळे ही पुष्कळ लोक


 अधिकान्याने पकडलें; तेव्हां खेळोजीनें निरुपायानें त्या अधिकाऱ्यास चार लाख रुपये देऊन तिची सुटका करविली. त्यानंतर लवकरच विजापूरकर व शहाजहान यांचा तह झाला, तेव्हां अदिलशहानें त्यास आपल्या नौकरींतून कमी केलें; तेव्हां तो आपल्या पूर्वजांच्या वतनाच्या वेरूळ या गांवीं येऊन राहिला, व आपले स्वतंत्र सैन्य जमवून तो आसपासच्या मोंगली प्रदेशांत लुटालूट करूं लागला. या वेळी अवरंगझेब हा दक्षिण प्रांताचा कारभार पहात होता; ( ता० १६ जुलई इ. सन १६३६ ते ता. २८ मे इ. सन १६४४पर्यंत ) त्यास ही बातमी कळल्याबरोबर त्यानें मलिक हुसेन या नांवाच्या एका सरदारास त्याच्या तपासावर पाठविले व त्यास युक्तीनें पक- इन (६. सन १६३९ आक्टोबर ) आणून ठार मारिलें.

 * बायझापूर - बैजापूर हे तालुक्याचे ठिकाण नगर जिल्ह्याच्या सर इद्दीवरील औरंगाबाद जिल्ह्यांत, औरंगाबाद शहराच्या पश्चिमेस अजमायें २५ मैलांवर आहे.