पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/९४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८३)

निजामशाही खजिन्यांतील अनेक मौल्यवान् जडजवाहीर व हत्ती वगैरेंची मागणी केली; परंतु ती फत्तेखानाने अमान्य केली; तेव्हां शहाजहान यानें त्याच्यावर पुन्हां सैन्य पाठविले. त्यावेळी या सैन्याबरोबर आपला निभाव लागणार नाही असे पाहून तो बादशहास शरण गेला; त्याच्या सर्व मागण्या मान्य केल्या; त्यास आठ लाख रुपये नजराणा भरला; आणि दरवर्षी निय- मीतपणें खंडणी देत जाण्याचे कबूल करून त्याने या संकटांतून आपली मुक्तता करून घेतली.

 इकडे शहाजी हा मोंगलांच्या नौकरीत असतां, फत्तेखान हा शहाजहान बादशहास शरण आल्यावर त्याने त्यास कांहीं प्रदेश जहागिरीदाखल दिला; त्यांतच पुणे व सुपें, हे शहाजीच्या जहागिरीचे प्रांत बादशहानें फत्तेखानास दिले; त्यामुळे शहाजीस अतीशय वाईट वाटून, त्याच्या मनांत अतीशय वैषम्य उत्पन्न होऊन, त्यानें मोंगलांचा पक्ष सोडिला व नाशिक, त्रिंबक, संगमनेर, जुन्नर, व उत्तर कोकणांतील कांहीं प्रदेश त्यानें आपल्या ताब्यांत घेतला; शिवाय फत्तेखानाच्या एकंदर विश्वासघाताच्या वागणुकीचाही त्यास अतीशय राग आला; व आपण निजामशाही जगविण्याचा प्रयत्न करावा, असे त्यास वाटू लागले. त्याप्रमाणे त्यानें विजापूर दरबारचा प्रसिद्ध व प्रधान- वजा असलेला ब्राह्मण सरदार मुरारराव याच्या मार्फत अदिलशहाशीं सख्य केलें; फत्तेखानाच्या विश्वासघातकी वागणुकीबद्दल त्या दरबारची खात्री पट वून दिली; निजामशाहीत कशी बेबंदशाही माजली आहे, हे निदर्शनास आणून तिचा फायदा करून घ्यावा, त्या राज्यांतील साधेल तितका प्रदेश आपल्या हस्तगत करून घ्यावा, अशी त्या दरबाराला सल्ला दिली; आणि दौलताबादच्या प्रसिद्ध, व महत्वाच्या किल्लधावर यावेळी फारशी धान्यसामुप्री नसल्यामुळे, तो हस्तगत करून घेण्यास, अदिलशाही सैन्य रवाना केल्यास, आपण त्या सैन्याला यशस्वी होण्यास मदत करू असे त्यास अभिवचन दिले. त्याप्रमाणे अदिलशाही सैन्य त्या किल्ल्यावर चाल करून आले; त्यावेळी फत्ते- खानानें लागलीच ही इकौकत मोंगल बादशहा शहाजहान यास निवेदन केली; व दौलताबादचा किल्ला मी आपल्या ताब्यांत देण्यास तयार आहे, असे कळवून त्याच्याकडे विजापूरकराविरुद्ध मदत मागितली. तेव्हा बाद-