पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/९५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ८४ )

शहानें लागलीच मोहबतखान यांस त्याच्या मदतीस पाठविलें; व त्यानंतर उभयतांच्या सैन्यामध्यें भयंकर युद्धसंग्राम झाला. शहाजीनेंही अदिल- शाही सैन्यातर्फे मोठ्या शौर्यानें युद्ध केलें; परंतु अखेरीस मोहबतखान विजयी झाला; व अदिलशाही सैन्यास माघार घेऊन परत जाणे भाग पडलें.

 त्यानंतर अदिलशहानें फत्तेखानास मोंगलांच्या पक्षांतून फोडून आपल्या पक्षाकडे ओढून घेतलें; तेव्हां फत्तेखान यानें दौलताबादचा किल्ला मोगलास देण्याचें नाकारिलें; व किल्लयांतून त्यानें व बाहेरून अदिलशाही सैन्य क शहाजी, यांनी मोंगल सैन्यास सारखा उपद्रव देण्यास सुरवात केली; परंतु फत्तेखानाच्या या विश्वासघातको वागणुकीमुळे मोहबतखान अतोशय चिडीस गेला; फत्तेखानाचा व निजामशाही राज्याचा समूळ उच्छेद करण्याच्या अट्टाहासानें त्यानें जोरानें युद्ध चालविलें; व अखेरीस विजयी होऊन त्यानें दौलताबादचा किल्ला आपल्या हस्तगत करून घेतला ( ता० १३ जून ३० सन १६३३). फत्तेखान व बालराजा हुसेन, हे मोहबतखानास शरण आले. त्यानें त्या उभयतांना शहाजहान बादशहाकडे पाठविलें; शहाजहान यानें हुसेनशहास ग्वाल्हेर येथील किल्ल्यांत प्रतिबंघांत ठेविलें; फत्तेखानास सालिना दोन लक्षांची नेमणूक करून देऊन त्याची लाहोर येथें रवानगी करून दिली; त्याचा दुसरा भाऊ चंगीझखान यांस मनसूरखान असा किताब देऊन त्यास बादशाही सैन्यांत दोन हजारांची मनसब दिली; आणि निजामशाही राज्य खाळसा करून आपल्या मोंगली साम्राज्यांत सामील करून टाकिलें,

 परंतु मरून मोंगलाच्या महाराज्यांत मिसळून गेलेला हा निजामशाही राज्यपुरूष, आपल्या समशेरीच्या संजीवनीनें पुन्हां जिवंत करण्यास एक धडा- डीचा कर्तबगार वीर पुढे सरसावला; व त्याने त्या राज्यपुरुषास जिवंत करून तो राजा निर्माण करण्याचा व राज्यकारभार चालविण्याचा धंदा करूं लागला. या वीरपुरुषानें स्वीकारिलेला हा धंदा, हीच मराठ्यांच्या राज्य- संस्थापनेची पूर्व तयारी होती; हिंदुस्थानच्या राजकीय रंगभूमीवरील मरा व्यांच्या भावी काळांतील उत्कर्षाची हीच नांदी होती; या मराठा सरदारानें सुरू केलेला हाच धंदा पुढे मराठ्यांनी चालू ठेविला; आणि इ. सन १७७१