पान:मराठ्यांचा इतिहास भाग ४.pdf/९९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
(८८)

एक पुत्र झाला, तोच व्यंकोजी राजे तंजावरकर हा होय. X आणि दुसरी व पहिलीहूनही अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे जिजाबाई व बाल शिवाजी या उभयतांवर आलेलें प्राणसंकट, व त्यांतून ईश्वरीकृपेनें त्यांची झालेली मुक्तता, ही होय. मोंगलाबरोबर युद्ध चालू असतां शहाजीनें मोंगली सैन्यास


मंदिरेंही बांधिली होती; सांप्रत हा वाडा नामशेष झालेला असून त्याच्या जोत्याचे अवशेष मात्र कांही ठिकाणी दृग्गोचर होत आहेत.

 गंगापूरच्या पूर्वेस सुमारें तीन मैलांवर "आनंदवल्ली " हे ठिकाण आहे; हे ठिकाण म्हणजे रघुनाथराव ( राघोबा दादा ) पेशव्याचें अमनचमन उड- विण्याचें, भाऊबंदकीच भुतें नाचविण्याचें, आणि फंदफितूरी व कारवाई - कारस्थानें करण्याचे आवडतें निवासस्थान होय.
( ७ ) हरीश्चंद्रगड - हे थंड हवेचे ठिकाण आहे.

 X शहाजीस याशिवाय नाटकशाळेपासून झालेले पांच पुत्र होते; त्या सर्वांच्या आयांची नांवें उपलब्ध नाहीत, परंतु शहाजीनें कोणी मता या नांवाच्या एका नाइकिणीस जमीन इनाम दिल्याचा तपशील उपलब्ध आहे. या पांच पुत्रांपैकी हिरोजी फर्जद हा शिवाजीच्या जवळ असे; पुढील काळांत आग्रा येथून शिवाजी निसटून आला त्या वेळी तो त्याच्या बदलीं पलंगावर निजला, व दुस-या दिवशी "शिवाजी महाराजाकरितां औषध आणण्यास जातों " असे पहारेक-यांना सांगून तो मोठ्या राजरोसपणानें मोंगलांच्या छावणीतून निघून गेला. शहाजीस या हिरोजीशिवाय संताजी, भिवजी, प्रता- पजी व रायभान असे चार नाटकशाळेपासून झालेले पुत्र होते; ते कर्नाटकांत तंजावर प्रांती व्यंकोजीजवळ रहात असत. त्यांपैकी संताजी हा शहाजीची गौण स्त्री नामें नरसाबाई हिचे पोर्टी झालेला पुत्र असून तो शहाजीचा अती- शयच लाडका होता. “ शहाजी महाराजांचा उजवा नव्हे, डावा नव्हे, तर केवळ हाटच असा होता " ( रा. म. वि. चंपू पहा.). तो धुढें, त्याला व्यंकोजीची वागणूक न आवडून त्याच्याशी भांडून शिवाजी कर्नाटकच्या मोहि- मेवर आला असतो त्याला त्रिवादी येथे येऊन भेटला; त्यास शिवाजीनें