पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/१४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १२ ) पुणे येथील डे० व्ह० ट्रा० सोसायटीकडून या ग्रंथाच्या पहिल्या भागास पन्नास रुपये बक्षीस मिळाले, त्या संबंधींच्या पत्राचा उतारा. ॥ श्री ॥ नं. २४३ सन १९२२ २३. डेक्कन व्हर्न्याक्युलर ट्रान्स्लेशन सोसायटीचें ऑफिस, पुणे शहर ता० २५८ सन १९२२. रा. रा. दत्तात्रय बाळकृष्ण करकरे, जळगांव पूर्व- खानदेश. यांस. वि. वि. या संस्थेकडून आश्रय मिळावा ह्या हेतूनें आपलें ता. २३।७।१९२१ चें अर्जासोबत पाठविलेलें पुस्तक मराठ्यांचा इतिहास भाग १ याचें परीक्षण होऊन ता. २२ आगष्ट सन १९२२ रोजीं भरलेल्या व्यवस्थापक मंडळीचे सभेनें असें ठरविलें आहे कीं, संस्थेनें आपणास सदर पुस्तकाबद्दल रुपये ५० ( पन्नास रु.) बक्षीस द्यावे व आपण संस्थेस सदर पुस्तकाच्या आणखी दोन प्रती द्याव्या. सवव ह्या पत्रासोबत पाठविलेल्या बिलाच्या चारी प्रतींवर पेनसलीनें 'सही' असें लिहिलें आहे तेथें सह्या कराव्या व पेनसलीनें फुली केली आहे तेथें तारखा घालाव्या. आणि सदर सर्व प्रति इकडे ताबडतोब परत पाठविण्याचें करावें. पुस्त काच्या प्रती व बिलाच्या प्रती आपणाकडून आल्यानंतर पुढील व्यवस्था होऊन सुमारें एक महिन्यानें बक्षीसाची रक्कम आपलेकडे मनीऑर्डरीनें पाठविण्यांत येईल. कळावें, लोभ करावा हे विनंति. " सही इंग्रजी " चिटणीस.