पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/२४

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

कसलें सांगितल्याने त्यास पश्चात्ताप होऊन तो ईश्वराची करुणा भाकूं लागला होता. आपण कोणतें घोर पाप केलें आहे, व त्याचें क्षालन कसे करावें, याचा तो आपल्या मनांत विचार करूं लागला; तेव्हा कुराणांत-मुसलमानी धर्मशास्त्राप्रमाणे दारू पिण्याची सक्त मनाई असून आपण दारू पितों हेंच आपलें घोर पातक आहे, व त्यामुळेच आपणांस अपयश भोगणे प्राप्त आहे; असे ह्मणून त्याने पुन्हां दारूला स्पर्श न करण्याचा निश्चय केला. तो ह्मणतो:-मी माहे जमादी ता० 23 रोज सोमवार या दिवशीं, घोड्यावर बसून आपल्या लष्करी अधिकान्यांची पाहणी करण्यास निघालों असतां एकाएकी माझ्या मनांत अनेक विचार येऊं लागले. रुतकर्माचा विचार करून झालेल्या चुकांबद्दल पश्चात्तापपूर्वक सुधारणा करण्याचा माझा परिपाठ आहे; त्याप्रमाणे मला हल्ली अपयश कां येतें याबद्दल मी आपल्याशींच विचार करूं लागलों; मी आपल्या मनाशींच ह्मणालों, " हे जीवा, तूं ह्या चालू क्रमाप्रमाणे या पातकी व्यवहारामध्येच किती दिवस सुख, विलास व ऐषाराम भोगत राहणार आहेस ! बाबारे, तुला काही तरी पश्चात्ताप होऊंदे ह्या पातकामुळे तूं किती अपवित्र बनला आहेस ! वारंवार होणाऱ्या निराशेमध्येच तुं सूख मानून घेत आहेस? तूं मनोविकारांचा अशा रीतीनें किता दिवस गुलाम होऊन राहणार आहेस? तूं अशा प्रकारच्या आचरणांत आपले कितीं आयुष्य व्यर्थ घालविलेस 1... तूं पवित्र धर्मकृत्यांत आपले आयुष्य वास्तवीकपणें खर्च केले पाहिजेस पण तसे न करितां तूं निषिद्ध व तिरस्करणीय अशा चैनांत, मोजेंत आणि करमणुकींतच नेहमीं मग्न राहून त्यांतच सुख मानितोस; पण यापुढे तरी अशा गोष्टींचा त्याग करून सर्व पातकांपासून मुक्त हो. " बाबर ह्मणतो, " ह्या प्रमाणे मी आपल्या जिवाला बोध करून असा निश्चय केला की, आपण मद्यपान करितों हेच आपले घोर पातक आहे; ह्मणून इतःपर मद्यपान कधींही करावयाचें नाहीं. नंतर मी माझी सोन्यारुण्याची आणि तशींच दुसरी सर्व मद्यपात्रें माझ्या समोर आणून फोडविलीं, आणि " पुन्हां मद्यपान करावयाचें नाहीं, " अशी मी शपथ घेतली. अशा रीतीनें मी माझे मन पवित्र केले; मद्यपात्रांचे सर्व तकडे मी फकीर व गरीब लोकांना वांटून टाकावले; मला ज्याप्रमाणे पश्चात्ताप झाला, त्याप्रमाणेच माझ्या बरोबर आसास यानांवाचा एक मनुष्य होता त्यालाही होऊन त्याने दाढी वाढविण्याचा निश्चय केला; पुढे त्यादिवशी रात्रीं, व दुसरे दिवशी मिळून सुमारे तीनशें अमीर, राज्य कारभारांतील मुख्य अधिकारी, शिपाई, व इतर सरदार मंडळा, यांनीही माझ्या प्रमाणेंच पुन्ही मद्यपान करावयाचें नाहीं, अशा शपथा घेतल्या. आमच्या बरोबर जें मद्य होतें, तें आह्मी जमीनीवर ओतिलें, आणि जी दारू बाबा दोस्त यानें आणिली होती, तींत मीठ मिसळून पिण्याला निरुपयोगी करून टाकण्याविषयीं मी हुकूम दिला. जेथें मी दारू " "