पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/३१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( १७ ) हिणविलें आहे, व तुह्मी मला निरुपयोगी व व्यर्थ श्रमाचें असें शिक्षण देऊन, मोठमोठ्या ऐतिहासिक, भूगोलसंबंधी, व तत्त्वज्ञानविषयक गोष्टी समजावून सांगून माझी बुद्धी अधीक ज्ञानसंपन्न करावयाची ती न करितां तिचा दुरुपयोग केला, असे त्यास टोंचून लिहिलेले आहे. हे पत्र पुष्कळ दृष्टीनें मनोरंजक व बोधप्रद आहे; तें खाली लिहिल्या प्रमाणे:-- 44 - -- , " तुझी मला अनावश्यक अशी अरची भाषा शिकविण्यांत फार दिवस घालवून, माझ्या कोवळ्या बुद्धीचा आणि तीक्षण स्मृतिशक्तीचा दुरुपयोग केला. ज्या भाषेचा कधींही उपयोग व्हावयाचा नाहीं, ती भाषा राजपुत्रांनां यावी ह्मणून दहा किंवा बारा वर्षे मला शिकवून त्यांत मला मोठा वैयाकरणी अथवा धर्मशास्त्रज्ञ करण्याचा तुमचा विचार होता, तो किती हास्यास्पद होता बरें ? उपयुक्त विद्या व कला यांचें ज्ञान बाल- कांच्या बुद्धीप्रमाणे देण्याकडे त्यांच्या लहानपणचा काळ घालवावयाचा; त्या काळाचा आमच्या गुरुजींनी असा दुर्व्यय करावाना ? आहारे भूगोलज्ञाना ! मला पोर्तुगाल, हॉलंड, किंवा इंग्लंड, हे देश काय आहेत व कोठें आहेत है कळू नये काय ! ते देश ह्मणजे बेर्डे आहेत कांद्वीपकल्प आहेत, अथवा सपाटीवर किंवा उंचचठ्यावर आहेत, है मला समजूं नये काय ? नुसतें मला चीन, इराण, काशगार, पेगू, तार्तारी, वगैरे ठिकाणचे राजे हिंदुस्थानच्या बादशहाचें नांव ऐकून धरधर कांपतात, एवढे सांगितल्यानें व तें ऐकल्यानें का इतिहासाची माहिती झाली असे समजावयाचें ! जगावर कसकश, व कोणकोणती राज्यें आहेत, तेथील रीतीमाती, आचारविचार, राजकारकीर्दी, धर्म वगैरे बाबतींची माहिती, त्या त्या राज्यांचा उत्कर्ष किंवा अपकर्ष, त्या त्या राज्यांची भरभराट होण्यास अथवा त्यांच्यावर आपत्ती येण्यास कोणकोणतीं शहाणपणाचीं, अथवा वेडेपणाच्या चुकांची कारणे घडलीं, आणि कोणत्या मोठमोठ्या गोष्टींनीं महान् महान् राष्ट्रांमध्ये विलक्षण फेरफार झाले, ह्यागोष्टी इतिहासाच्या ज्ञानाशिवाय कशा कळाव्या ? त्या तुझी मला शिकविल्या काय ? राजपुत्रांनां असे अनेक महत्वाचे व विविध विषय शिकून आपली बुद्धी प्रगल्भ व ज्ञानसंपन्न करावयाची असते, आणि त्यांच्या आयुष्यांतील ज्ञानसंपादनाच्या कालापैकी प्रत्येक क्षण मोठा किंमत- वान असतो, हे समजून तुझी माझ्या कालाचा आणि आयुष्याचा कोणता चांगला विनियोग केला १ तुह्मी मला नाहीं नाहीं त्या पोकळ, व, ध्यानात ठेवण्याला अतिशय कठीण, किंवा बुद्धीमध्ये घोटाळा करून टाकणान्या आणि मनुष्यदेहास किंवा त्याच्या जगतीय वर्तनास केवळ निरुपयोगी, अशा प्रकारच्या परकीय माषाज्ञानाच्या वगैरे गोष्टी मात्र काय त्या शिकविण्यात आपली कामगिरी बजाविली, असें दाखविल्या सारखे होत नाहीं काय? परभाषा शिकवून तिच्या योगानेंच काय तीं शाखें, धर्म विवेचन, न्यायनीति किंवा इतर आवश्यक ज्ञान शिकविण्याचा तुह्मास सुलभ मार्ग होता काय ! हे सर्व आवश्यक ज्ञान तुझाला आपल्या जन्मभाषेत मला देतां आलें नसतें