पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/३८

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २४ ) औरंगझेब हा एक अत्यंत दैदिप्यमान हिरा होता; पण तो बद दानतीच्या कोंदणत असल्यानें गारगोटीच्या किंमतीचा झाला होता. ! आपल्या आयुष्यभर अधोर करील. मरणकाळच्या यातना आणि क्लेश एकामागून एक मला सारखे भासूं लागले आहेत ! बहादूरशहा अजून जेथें होता; तेथेंच आहे; परंतु त्याचा मुलगा हिंदुस्थानाजवळ येऊन पोहोंचला आहे. बेदरबख्त हा गुजराधेन आहे. हय्यत अल्-निसा यानें आजपर्यंत कोणत्याही प्रकारच्या दुःखाचा अनुभव घेतला नव्हता. त्याजवर हल्ली दुःख संकटांचा केवळ वर्षाव होत असून, त्यांमध्यें तो अगदी बुडून गेला आहे ! बेगमची काळजी घे उदेपुरी हिनें माझ्या अजारोपणासंबंधानें फार कष्ट करून अतीशय श्रम सोशिले आणि ती माझ्याश सहगमन करण्याची इच्छा करिते; परंतु कोणतीही गोष्ट प्रसंगाप्रमाणे होणारी आहे. आपल्या कुटुंबांतील किंवा दरबारांतील जी माणसें आहेत त्यांना-मग ते अप्रामाणिक याने किंवा अविश्वासानें चागले तरीही वाईट रीतीनें वागवूं नकोस. आपले हेतू आणि उष्टकार्ये सिद्धीस न्यावयाची झटले ह्मणजे सभ्यता आणि युक्ति यांनींच तुझें काम होईल; व त्याचगुणांची नेहमीं आवश्यकता असते. अंथरूण पाहून पाय पसरावे. आपल्या शक्तीप्रमाणेच एखादें काम करण्यास हात घालावा. फौजेंतील लोकांचा मुशाहिरा देण्याचा राहिलाच असून, न्यांच्या तक्रारी आणि कटकटी अजून शिल्लकच आहेत. दाराशेखो बानें न्यायानें व सदिच्छेने आपल्या लोकांस बैठे पगार देण्याचे ठरविलें; तरीपण त्याजकडून त्यांना अगदीच थोडा पगार मिळत आल्यामुळे त्याचे लोक त्याच्यावर नाखूष असत. आतां मी जातों ! मी जे काहीं बरें वाईट केलें, केवळ तुमच्या करितांच केलें; माझ्या विषयीं तुझा मलताच काहीं ग्रह होऊं देऊं नकोस, व तुला माझ्या कडून जें कधीं दुःख किंवा शिक्षा झाली असेल, तिचें स्मरणही करूं नकोस; त्याबद्दलचा आता हिशोबच नाही असे समज. कोणीही आपला जीव कुडींतून निघून जातांना पाहिला नाहीं; परंतु मला माझा जीव कसा माझ्या कुडींतून निघून जात आहे, ते दिसत आहे 1 हाय, हाय !! विशेष खुलासा:- ( १ ) दाराशेखो हा शहाजहान याचा वडील मुलगा, व अवरंगलेचाचा बडील माऊ; याचा अवरंगझेबानें ता० ३० आगष्ट इ० सन १६५९ रोजी वध करविला ! - ( 2 ) - उदेपुरी ही औरंगझेबाची अतीशय आवडती यायको होती; कामचक्ष हा हिच्याच पासून ओरंगझेचास झालेला मुलगा होता; ( जन्म; दिल्लीयेथें ता० २४ फेब्रुवारी ३० सन १६६७; ) अवरंगझेबाच्या मृत्यूच्यावेळीं तो विजापूर येथील कारभारावर होता, अवरंगानें आपल्या मरणापूर्वी मृत्युपत्र करून आपले राज्य मुअज्जम,