पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/५६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

महंमदाचे असे झणणे होतें कीं, देव हा एकच आहे; आपभापति परस्परांशी युद्ध करणें, मूर्तीची पूजा करणे, या गोष्टी निषिद्ध आहेत; या आपल्या धर्मतत्वांचा त्यानें मदिना येथें उपदेश करण्यास सुरवात केलो, आणि तीन वर्षातच त्याठिकाणीं त्याच्या सभोवती पुष्कळच शिष्यसमुदाय जमा झाला. महमंद मक्का येथून स्थानत्याग करून मदिना येथें गेला, तथापि मर्केतील लोकांनी त्याठिकाणी जाऊनही त्याचा छळ चालू ठेविला होता; त्यामुळे त्यास स्वतःचा बचाव व स्वस्थापित धर्माचें संरक्षण करण्याकरिता हातात शस्त्र घेणे भाग पडलें; त्यानंतर त्याने असा परमेश्वरी हुकूम प्रसिद्ध केला कीं, आजपर्यंत शांततेनें व नम्रपणानें या नवीन धर्माचा लोकांना उपदेश करण्यांत आला; परंतु पूर्व दुराग्रहामुळे त्यांनी त्याचा स्वीकार केला नाहीं; ह्मणून यापुढे मी प्रस्थापित केलेला धर्म जे लोक स्वीकारणार नाहीत, त्यांना शस्त्राने पादाक्रांत करावें, व आपल्या धर्माची त्या लोकांत वृद्धी करावी. या कामी यश आल्यास आपल्या धर्माची वृद्धी होऊन शिवाय आपणास संपत्तीचाही लाभ होईल, आणि मृत्यु आल्यास महत्पुण्य घडून आपणास स्वर्गाचा मार्ग मोकळा होईल, अशा रीतीने महंमदाने आपल्या अनुयायांमध्यें नवें लष्करी तेज उत्पन्न केलें, व त्यांना आणि महंमदाला तरवारीच्या बळावर आपण आपल्या धर्मांचा निरनिगळ्या प्रदेशांत व चोहोकडे प्रसार करूंशकूं, अशी खात्री वाटू लागली. , महमंद मदिना येथें येऊन राहिल्यानंतर मक्केमधील एक प्रसिद्ध सावकार, व वजनदार मनुष्य, आणि कुराणांतील निरनिराळ्या अध्यायांचे एकीकरण करणारा त्याचा शिष्य अबूबकर याची मुलगी नामें आयेषा हिच्याशी त्यानें लग्न केलें; त्यानंतर त्याचा शिष्य- समुदाय सारखा वाढत जाऊन त्याच्या सभोवती थोडक्याच काळात दीड लक्ष मंडळी एकत्र जमा झाली. तेव्हा महंमदाने मदिना येथील चेयंदशाही मोडून सुध्यबस्था केली.

  • गीतेंत भगवान श्रीकृष्णानी ( सांख्य योग; अध्याय दुसरा श्लोक ३७ पहा; )

अर्जुनाला युद्धास उद्युक करितांना अशाच आशयाचा उपदेश केला आहे तो येणें प्रमाणेः-2 हतो वा प्राप्स्यसि स्वर्गे जित्वा वा भोभ्यसे महीम् ॥ तस्मादुष्तिष्ठ कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः ॥ - अर्थः- युद्धात मारला गेलास तर तुला स्वर्ग प्राप्ति होईल, व यशस्वी झालास तर पृथ्वचें राज्य मिळेल- झणजे जय अथवा पराजय, यांतील काहीही घडून आले तरी तुला लाभच प्राप्त होणार आहे, आणि जयाविषयीं जरी खात्री नसली तरी लाभाविषर्थी तिळमात्रही संशय नाहीं- हाणून हे अर्जुना, ( शत्रूत मारीन किंवा मरेन असा ) मनाचा निश्वय करून युद्ध करण्यास तयार हो.