पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/६३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

सतत दोन शतके पर्यंत इंग्लंडने आपले सर्व धोरण समुद्रावरील वर्षस्व व परदेशांबरोबरील आणण्यात येऊं लागले, आणि ऐर्लंडमध्यें तर हल्लींही बटाटे हाच ऐरिशलोकांचा मुख्य खाण्याचा पदार्थ बनून गेलेला असून त्याच्यावरच बहुतेक सर्वांशी त्यांचे जीवन अवलंबून आहे. व्हर्जीनियाजवळील उत्तरकारोलीना या प्रांताच्या राजधानीच्या शहरास त्याच्या स्मरणार्थ व सन्मानार्थ रॅले हेंच नांव देण्यात आले आहे. सर वाल्टर रॅले हा मोठा धाडशी खलाशी, प्रवासी ● शुरयोद्धा होता; व तो एलिझाबेथ राणीच्या विषेश मेवानींतील होता. एलिझाचेथ मृत्यू पावल्यानंतर स्टुअर्ट घराण्यातील पहिला जेम्स हा गादीवर आला. ( इ. सन १६०३ मध्ये. ) याच्या कारकीर्दीच्या प्रारंभीच, गेमनक्याथलिक लोकांनी, जेम्स राजा व इतर प्राटेस्टंट पंथाचे सरदार वगैरे मंडळी, यांना ठार मारण्याचा, व अरबेला स्टूअर्ट हीस त्याच्या ऐवजी गादीवर बसविण्याचा एक भयंकर कट उभारिला आणि पार्लमेंट सभागृहाच्या खालील तळघर भाड्याने घेऊन व त्यांत दारूची विपे भरून ठेऊन जेम्स राजा आणि लार्ड व कामन्स समेतील सभासद पार्लमेंटच्या सभागृहामध्यें तें उघडण्याच्या वेळी एकत्र जमतील त्यावेळी त्यास आग लावुन तें उडवून देण्याची सिद्धता केली; हा भयंकर कट अत्यंत गुप्त ठेवण्यांत आला होता; परंतु त्यांतील एका मनुष्यानें, आपल्या पार्लमेंटचा सभासद् असलेल्या एका नातलगास, भावी भयंकर अरिष्टाची मोघम सूचना दिली, आणि ता. ५ मोहेंबर रोजी ( इ. सन १६०३ ) पार्लमेंटची पहिली सभा भरण्याच्या वेळी तेथें हजर न राहण्याविषयी त्यास कळविलें; परंतु त्यास हे पत्र मिळाल्याबरोबर त्यानें तें गुप्त न ठेवितां ताबडतोय जेम्त राजास दासविलें, त्याबरोबर या संबंधीत लागलीच चोहोकडे मोठ्या जोरानें तपास सुरू झाला, त्यावेळी पार्लमेंट गृहाच्या खालील तळघरही तपासण्यांत भालें; तो त्यति सहा मोठमोठी पिपें दारूने भरून ठेविलेली आहेत, व मे फॉक्स ( Guy Fawkes ) या नांवाचा एक मनुष्य तेथें जवळच सूचना मिळाल्यायरोबर दारूच्या पिपास आग लावण्याकरिता तयारीनें उभा आहे असे आढळून आलें; तेव्हा त्यास पकडून या कटासंबंधी चौकशी करण्यात आली; आणि गे फॉक्स वगैरे पुढारी मंडळीला देहांत शासन करून हा कट मोडून टाकण्यांत आला; लेडी अरबेला स्टूअर्ट हिला, या कटासंबंधी काहीही माहिती नसताना सुद्धा आपल्या परवानगीशिवाय तिनें लग्न केले असा तिच्यावर आरोप ठेऊन तिला लंडन टॉवरमध्यें कैदेत ठेवण्यात आले, आणि त्याच ठिकाणी ती वेडी होऊन मृत्यू पावली; या कटास " मेनलॉट" अथवा "गनपॉवडर प्लॉट" असें ह्मणतात; त्या नंतर जेम्सराजाला पकडून, त्यास लंडन टॉवरमध्ये घेऊन जाऊन, त्याच्या कडून आपणास विशेष चांगल्या रीतीनें वागवूं अशाबद्दलचें वचन मिळवून घेण्याबद्दल "