पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/७१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(९ २१ ) करणे किंवा करुणा भाकणे, या गोष्टी कुराणांत मना केलेल्या आहेत; आणि " प्रत्येक मनुष्याने आपल्या आयुष्यातच काय तो पुरुवार्थ साधून ध्यावा, मृत्यूनंतर त्याची · कांहींही किमत नाहीं; अतें अततां आपल्या मृत्यूनंतर सुद्धा आपली योग्यता मोठी आहे, अर्से समजून ती कायम ठेवण्याचा प्रयत्न करणें निंद्य होय, " अता महंमद पैगं- बराचा उपदेश आहे. ८ मुसलमान लोकांत हिंदू व ख्रिस्ती लोकांप्रमाणेच वर्षांच्या बारा महिन्यांची काल गणना करितात; ते बारा महिने हणजे १ मोहरम, २ सफर, ३ रबीलावल, ४ रवीलासर, ५ जनादिलाखर, ६ जमादिलावलू, ७ रज्जय, ८ सायान, ९ रमजान, १० सन्चाल, ११ जिल्काद, आणि १२ जिछेद, हे आहेत, त्यांतील रमजान हा उपवासाचा, व मोहरम, रज्जव, जिल्कार, व जिल्हेज हे चार महिने पवित्र ह्मणून मानण्यात येतात. मुसलमान लोकांत हिंदूरमाणेच लमाच्या बाबतींतील सर्व अधिकार वधुवरांच्या आई बापाकडेसच असतो, त्यानमार्णेच त्यांच्यात लमे लावण्याचा अधिकार फक्त काजीस मात्र असून स्याच्या खेरीज अथवा त्याच्या हुकूमाखेरीज लग्न लागूं नये, असा त्यांच्यांत निबंध असतो; लग्न होण्याच्या आधी " हेन्नावंदी "चा ह्मणजे नवन्या मुलाचे हात हेन्ना ( मेंदी ) ने रंगविण्याचा विधी करण्यांत येतो, आणि हिंदू लोकातील हळदीप्रमाणेच वधूच्या घरून हा हेमा नवन्या मुलाच्या हातापायास लावण्याकरितां येत असतो. राजेरजवाडे, अमीर उमराव, जहागिरदार जमिनदार वगैरे बडे लोकांमधील हा विवाह समारंभ असल्यास हेन्ना बरोबर दागदागिने, मोल्यवान नजरनजराणे व पोषाख पाठविण्यात येतात आणि हेन्ना लावण्याचा विधी मोठ्या थाटानें करण्यात येतो, हेन्नाचा विधी आटोपल्यावर वराकडील मांडवांत दरबारचा समारंभ होतो, त्यावेळी नाच अथवा गाणे होतें; बाहेर दारूकाम सोडण्यात येते सर्व नजराणे मोठमोठ्या ताटीत घालून मांडून ठेवण्यात येतात; व रात्री घाटाची मेजवानी होते. त्यानंतर निश्चित झालेल्या विवाहकालापूर्वी मोठ्या भपक्याची व जमावाची मिरवणूक निघून नवरा मुलगा वाजत गाजत वधूच्या घरी जातो, निश्चित काली लम लागून, पानसुपारी, अतरगुलाय, दारूकाम, व आपतबाजी सोडणे, वगैरे सह मोठ्या घाटाचा समारंभ होतो; त्यानंतर घराकडून वधूस देणगी देण्यांत येते व मेजवान्या, खाने, शेवटी परत भेटी, व परत पोषाखाचा दरयार होऊन हा समारंभ पूर्ण होतो. · महंमदास्या मृत्यूनंतर (इ.स. ६३२) त्याच्या गादीवर मदीना येथे लोकांनीं निवडलेले चार खलीफा एकामागून एक गादीवर आले; ते :- १ अबुधकर ( इ. सन६ ३२ ते ६३४) २ उमर, (इ. सन (३४ ते ६४४ ) ३ उस्मान, (इ. सन ६४४ ते ६५६ ) आणि ४ अल्ली, (इ, सन ६५६ ते ६६१ ). या चार खलीफांची मिळून एकंदर कारकीर्द