पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/७६

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व या भयंकर कत्तीतून हसन व हुसेनची बहीण नामें झेनाच, व अली आणि उमर हे दोन मुलगे, एवढींच माणसें कायतों बचावून जिवंत राहिली. , मुतलमानांत शीया व सुनी असे दोन पंथ आहेत; त्यापैकी शिया पंथाचा कल, व त्यांची धार्मिक व इतर मतें हिंदूशी बन्याच प्रमाणांत मिळती असून ते देवभोळे आहेत; पैगंबरानंतर जे पहिले तीन खलीफा झाले, त्यांचा पैगंबराशी शरीर संबंध नसल्यामुळे ते माननीय नाहीत, असे या पंथांतील लोकांचे मत असून ते पहिल्या तीन खलीफांत मानीत नाहीत; तर महंनद पैगंचराच्या वंशासच ते भजनात; लणजे सय्यद घराण्याच्या शरिरांतील धमन्यांतून महंमद पैगंबराचें शुद्ध रक्त अद्यापि खेळत आहे. असे समजून ते पैगंबराच्या वंशास भजतात, व हिंदुच्या मूर्तिपूजेच्या धर्तीवर ताबुतांत हुतेनचें भजन करितात, थोडक्यांत ह्मणजे अढीच्या पक्षास शिया ह्मणतात. उलटपक्षीं सुनी पंथाचा कल व त्यांची धार्मिक व इतर मतें हिंदू धर्माशी पुष्कळच अंशीं विरोधी आहे;हिंदूधर्म ह्रगजे निव्वळ मूर्तिपूजा, असे त्यांचें मत आहे. ते देवभोळे नाहींत, व परमेश्वराचें स्वरूप, पुनर्जन्म वगैरे बाबतीतील त्यांची मतेंही हेकेखोरपणाची नाहीत. पैगंबरानंतर जे चार खलीफा होऊन गेले ते मदिना येथील धर्मसमेनें निवडलेले असल्यामुळे ते माननीय आहेत असे समजून या पंथांतील लोक पहिल्या चारी खलिकांत मानितात, आणि महंमदाच्या औरस वंशजांत दैविक अंश आहे असे त्यांना वाटत नाहीं, त्यामुळे ते पैगंबराच्या वंशजांत भजत नाहींत. शिया व सुनी या पंथांतील विरोधाचें स्वरूप थोडक्यांत वर लिहिल्याप्रमाणें आहे | इ० सन १५१६ मध्ये कन्स्टाटिनोपल येथील बादशहा पहिला सेलीम ऊर्फ सुलेमान धीट या ईजिप्त देश जिंकून आपल्या राज्यात जोडिला, त्यावेळी त्यानें पैगंबराच्या अस्थिव तेथील आयातीवंशांतील खलीफा मूतवकिल यांजकडून खिलापती चें पद आपणास प्राप्त करून घेतले. तेव्हा सून ऑटो मन लणजे युरोपातील टर्कीचा बादशहा यांतच मुसलमान लोक सर्व साधारणतः आपला खलीफा असे मानितात परंतु तो महंमदाच्या वंशापासून जन्मलेला नसल्यामुळे शिवापंथी कहे मुसलमान त्यास आपला खलीफा न मानितां इराणच्या शहास आपला खलिफा मानितात, त्याप्रमाणेच मोरोक्को व स्वाच्या आसपासच्या प्रदेशांतील मुसलान लोक मोरोक्कोच्या सुलतानास आपला खलीफा समजतात; तथापि हल्ली मुसलमानी धर्माचा पूर्वीरमाणे प्रसार होत नसल्यामुळे तुर्कस्थान ऊर्फ टकच्या सुलतानासच सर्व साधारणतः खलीफा मानग्यांत येत असते; थोडक्यांत लणजे शिया व सुनी या उभयतां पंथांचा त्यांच्या धर्माशी कोणत्याही प्रकारें संबंध नसून उभयतांचें "कुराण" हेच धर्मपुस्तक आहे. तथापि त्या पंथांमध्ये वर "