पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/७९

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(२९ ) डोळा असल्यामुळे त्यानंतर पुन्हा चाळीस वर्षांनी ३० सन ७१७-१८ मध्ये त्यांनी पुन्हां तें ठिकाण हस्तगत करून घेण्याचा प्रयत्न केला; परंतु गेमन बादशहा लिओ इसोरियन यानें याही वेळी त्यांचा प्रयत्न हाणून पाडून त्यांना माघार घ्यावयास लाविलें; पण इतकें झालें तरी अखेरीस ओटोमन तुर्कीनी दुसन्या महंमदाच्या कारकीर्दीत ( इ० सन १४५१ ते १४८० ) कान्स्टांटिनोरल व बास्फरतचो सामुद्रधुनी इ० रुम १४५३ मध्ये आपल्या हस्तगत करून घेतली; ती आजतागायत त्यांच्याच ताब्यांत आहे. - खलीफा मुआविया, हा, वीस वर्षे राज्यकारभार करून इ० सन ६७९ मध्यें मृत्यू पावला; 'याच खलिफाच्या कारकीर्दीत खलीफा नेमण्याच्या पूर्वपद्धतीत फेरबद्दल करण्यात आला, व हे पद नेहमी स्वतःच्या वंशाकडेच चालत रहावे, अशी नवी पद्धती त्याने सुरू केली; परंतु त्यामुळे लोक सभा नामशेष झाली; खलीफावरील जनतेचा दाच नाहींसा झाला व एकतंत्री, कारभार सुरू होऊन पुढे खलीफत कमजोर होत गेली. मुआवियाचा मृत्यूनंतर त्याचा मुलगा यजीद, त्यानंतर दुसरा मुआविया व नंतर मरवान, असे तीन साधारण कर्तृत्वाचे खलीफा गादीवर आले. त्यानंतर अब्दुल मालिक या नांवाचा एक शूर व कर्तृत्ववान खलीफा इ०रुन ६८४ मध्ये गादीवर आला. त्याच्या जवळ तरिक या नांवाचा एक मोठा शूर सेनानायक होता; त्याने युरोप खंडाच्या नैऋत्य व स्पेन देशाच्या दक्षिण टोंकावर एक "जेबल " हणजे किल्ला बांधून त्यास आपलें "जेचल - तारिक " लणजे तरीकनें बांधिलेला किल्ला है नांव दिलें; हाच प्रसिद्ध जिबालटरचा किल्ला होय; युरोप आणि आशिया या दोन्ही खंडांमध्यें अतिशय प्राचीन काळापासून व्यापार चालू असून प्राचीन काळी ह्मणजे इ० रुनापूर्वी दोन हजार वर्षांचे अगोदर तो खाल्डियन लोकांच्या ताब्यात होता; पुढे अरब आणि फिनिशीयन या उभय तांनीं त्यांत प्रमुख स्थान मिळविलें यापैकी फिनिशियन लोकाचें राज्य भूमध्य समुद्रांवर सीरिया प्रांताच्या किनान्यास होतें, व इ० सनापूर्वी एकहजार वर्षांपासून इ० सना- पूर्वी पांचशेपर्यंतहणजे पांच वर्षेदत व्यापामुळे अतिशय संपन्न बनलेलें होतें; या फिनिशियन लोकांची एक शाखा अफ्रिखा खंडाच्या उत्तर किनान्यावर उदयास आली, व तिनें सिसिली बेटानजीक आफ्रिका खंडाचें टोंक ज्या ठिकाणी भुमध्य समद्रांत जाऊन घुसले आहे, त्याठिकाणी कार्थेज हैं शहर व बंदर वसवून तेथें आपलें एक स्वतंत्र राज्य स्थापन केलें; आणि कार्सिका, माल्टा, सानिया, स्पेनचा दक्षिण भाग व त्या देशांलगतचीं बेदें, हीं आपल्या अमलांखाली आणिली; या राज्यांतील फिनिशियन लोक पूर्वेकडील देशाशीं व्यागर करून अतिशय सधन झाले होते, त्यामुळे रामन लोकांत त्यांच्यासंबंधी अतिशय स्पर्धा उत्पन्न होऊन त्यांनी फेनीशियन लोकांस