पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/८०

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

(३० ) , नामशेष केलें व कार्थेज येथें रोमन अंमल सुरू केला; हेच कार्थेज शहर अब्दुल मलिक या खलिफाच्या कारकीर्दीत मुसलमान लोकांनी जाळून टाकले. या काळांत रॉड्रिक या नांवाचा एक राजा स्पेनमध्ये राज्य करीत होता; त्याने आपला शूर गाँथ सरदार काउंट ज्यूलियन यास अतिशय वाईट रीतीने वागविलें; त्यामुळे रॉड्रिक याचा सूड उगविण्याकरितां त्यानें मुसलमान लोकांस स्पेनमध्ये बोलाविलें; त्याप्रमाणे त्यांचा दुसरा प्रसिद्ध सरदार अब्दुर्रहमान यानें इ० सन ७११ मध्यें, साधु स्वभावाचा खलिफा दुसरा उमर याच्या कारकीर्दीत त्याच्या हुकुमानें जिमालटरच्या सामुद्रधुनीमधून स्पेन देशांत जाऊन तो देश हस्तगत करून घेतला. आफ्रिका खंडांतील ट्यूनिस प्रांत आपल्या हस्तगत करून घेऊन केंगे ऊर्फ कायरो हैं शहर वसविलें आणि पिरनीज पर्वत ओलांडून अग्बांनी फ्रान्स देशावर चाल केली; परंतु टुर्स येथील विध्वंसकारक पराजयानंतर मुसलमान लोक आजतागायत पुन्हा पिरनीज पर्वताच्या पलीकडे गेले नाहीत; - खलीफा मुआविया याच्या कारकीर्दीप सून निव्वळ " जन्मःचा योगायोग " Accident of Birth ) अथवा " जन्मयोग " प्रधान मानिला गेल्यानें मुसल- मानांचें राजकीय दृष्ट्या जवढे नुकसान झाले, त्याहूनही पुष्कळच अधिक पटीने दुरुंच्या विध्वंसकारक पराजयामुळे ते झालेले आहे; आणि युरोपियन राष्ट्रांवरील भयंकर अरिष्ट नाहीसे होऊन पुढें तें खंड सुधारणा संपन्न व श्रीमान बनलेले आहे. या काळानंतर लवकरच इ० सन ७५० मध्यें दमास्कस येथील उमईद वंश नामशेष झाला; तथापि या पंशांतील खलीफांचें वैभव असामान्य असून त्यांच्या राजधानीचे शहर दमास्कस हैं अतिशय श्रीमंत व सौंदर्यवान होते. आणि त्याची त्या काळांत जगातील सर्व शहरामध्यें " पहिल्या प्रतांचे उत्तम शहर " ह्मणून गणना होत होती. सर्व शहरभर पाण्याचा मुबलक पुरवठा व्हावा ह्मणून सात मोठमोठाले कालवे यांधून शहरांत आणिले होते. नळ बांधून सर्व शहरभर ते खेळविण्यांत आले होते आणि थोडक्यांत ह्मणजे मोठमोठे वाडे, इमारती, खलिफांचे राहते वाडे, विस्तिर्ण बागा, ठिक- ठिकाणी पाण्याने भरलेले होंद, व पाणी उडत असलेली कारंजी, नक्षीदार कम्पनी, घुमट, मनोरे वगैरे साधनांनी त्या शहरास कल्पनातित शोभा व रमणीयता प्राप्त झाली होती. खलीफा मुआवियानें अल्लीच्या वंशाचा पाडाव करून मदिना येथून दमास्कस येथें खिलाफत नेल्यावेळेपासून या उभयतां वंशामध्यें हाडवैर चालत आलेले होते, आणि अल्लीचा वंश मुआविास्या वंशाचा पाडाव करण्याची संधी पहात होता. त्याप्रमाणें इ० सन ७५० मध्यें या वंशातील शेवटचा खलीफा मरवान ( दुसरा ) हा गादीवर असतांना