पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/८१

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

, महमदपैगंचराचा चुलता अब्दुल अब्बास यानें त्याचा झाच नदीवरील युद्धांत पराभव केला, आणि तेथीत नदीच्या कांठीं बगदाद या नांवाचें एक शहर स्थापन करून दमास्कस येथून ३० सन ७५० यावर्षी तलीफांची गादी त्या ठिकाणी नेली; या खलिफांना “ आमचासी खलिफा " असें ह्मणतात; अब्दुल आव्यास याच्या मृत्युनंतर त्याचा भाऊ मनसूर हा खलिंफा झाला; आणि इकडे मुआवियाच्या अथवा उमईद वंशांतील अब्दुरहमान या नांवाच्या एका पुरुषानें इ० सन ७५० नंतर सहाच वर्षांनी ३० सन ७५६ मध्ये स्पेन देशांत आपली एक स्वतंत्र गादी स्थापन केली आणि सुलतान ही पदवी धारण करून तिकडे त्याने आपला अंनल सुरू केला; या वंशाच्या राजधानीचे शहर कोर्डोंव्हा हें असून, तितरा अब्दुरहमान हा आपणास खलीफा ह्मणून घेऊं लागला, व अशा रीतीनें युरोपांतील स्पेन देशामध्यें एक स्वतंत्र खिलापत निर्माण झाली. कोडोंव्हा हैं शहर या घराण्यातील खलीफांनी अतिशय भरभराटीस आणिले, आणि तेथील विद्यालयाचा तर सर्व जगभर लौकिक पसरला होता; या वंशाने स्पेनमध्यें इ० सन ७५६ पासून इ० १०३१ पर्यंत हागजे २७५ वर्षे राज्य केलें; परंतु इ० सन १०३१ मध्यें चानें त्यांच्या सत्तेचा नाश करून स्पेन देशामध्ये पुन्हा ख्रिस्ती राज्याची स्थापना केली; त्या प्रमाणेच इकडे बगदाद येथे आच्चासी वंश इ० सन ७५० पासून इ० सन १२५८ पर्यंत, लणजे ५०८ वर्षे अस्तित्वात राहून त्यानंतर तो नामशेष झाला. बघदाद येथील या आव्बासी वंशांत अत्मसुद हारून उर्फ हारून-अल- रशीद ( इ० सन ७८६ ते ३० सन ८०९ ) व त्याचा दुसरा मुलगा मामून उर्फ अब्दुल्ल अल्- मामून, ( इ० सन ८१३ ते ८३३ ) हे अतिशय प्रसिद्ध खलीफा निर्माण झाले; व त्यांच्या कारकीर्दीत निरनिराळ्या विद्या, शाखें, तत्वज्ञान व इतर वांग्मय यात अरब लोकांनी अतिशय प्रगती करून कीर्ती मिळविली; व त्यांनीच बहुविध ज्ञानाचा सर्व जगभरही प्रसार केला; त्याप्रमाणेच दवाखाने, धर्मशाळा, रस्ते, कालवे, पूल, वगैरे अनेक लोकोपयोगी कामे करून त्यांनी आपल्या प्रजेची अतिशय भरभराट केली. या खलीफांच्या कारकीर्दीत पहिल्या दीडरों वर्षांत विद्या, वांग्मय व विजय या तीन्हीही बाबतींत अरबानीं अग्रस्थान मिळविलें, खलीफा हारून यानें रोमचा बादशहा निती- फोरस याचा पराभव करून त्याच्यापासून खंडणीही वसूल केली; आणि पश्चिमेस भूमध्य- समुद्रापासून तो पूर्वेस थेट सिंधूनदापर्यंत आणि उत्तरेस मध्य आशियांतील आशिया मायनर मधील मैदानारासून तों दक्षिणेत थेट हिंदी महासागरापर्यंत आपली अबाधित सत्ता स्थापन केली. तथापि या वंशांत पुढील काळांतील खलीफा दुर्बळ निघाले, व नवभ्या शतकाच्या प्रारंभापासूनच त्यांच्या सत्तेस ओहोटी लागण्यास प्रारंभ होऊन आशिया