पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/८३

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( ३३ ) कायरो येथे गेला आणि त्याठिकाणी इजितच्या सुलतानाच्या परवानगीनें त्यानें खलीफा है पद धारण केलें; त्यास मसलमानी जगांतील पुष्कळ मुसलमान लोक आपला खलीफा अथवा धर्मगुरु असें मानीत होते, परंतु त्याच्या जवळ सैन्यही नव्हतें, आणि त्या देशाच्या राज्यकारभारामध्येही त्याचा कोणत्याही प्रकारें संबंध नव्हता. इ. सन ११७१ मध्यें सलादिन यानें फातिमईद खिलाफत नष्ट केल्यानंतर इ० सन १५१७ पर्यंत इजित देश मॉमलक ( बगदादचे खलीफा आणि सामानी सुलतान हे तुर्क लोकांना आपल्या सैन्यांत आणि खास स्वतःच्या संरक्षगासाठीं “ शरीरसंरक्षक" ह्मणून नौकरींत ठेवीत असत; याच शूर व लष्करी बाण्याच्या तुर्क लोकांना इजितमध्यें मॉमलुक अशी संज्ञा प्राप्त झाली. ) सरदारांच्या ताब्यांत होता; तो इ० सन १५१६ मध्ये टर्कीचा बादशहा सेलीन यानें तेथल सग्दरमंडळांकडून जिंकून घेतला, त्यावेळी त्याने तेथील आव्यासी वंशाकडून खिलाफतीची गादी व खलीफांचें पत्र आपणास प्राप्त करून घेतलें. व मुसलमानी जगाच्या इतिहासाच्या दृष्टीने नववें शतक है विशेष महत्वाचे लगून मानियेण्यासारखें असून याच शतकांत इस्लामधर्मात मानवजातीची पुष्कळच मोठी भर पडलेली आहे, आणि त्याचे राजकीय परिणामही अतिशय महत्वाचे असेच घडून आले आहेत; मध्य आशियांतील मोंगल, तुर्क, तातीर वगैरे धनगरी पेशाचे लोक प्रारंभों मुसलमान नसून त्यांच्यापैकी मांचू ऊर्फ मोंगल हे बुद्धधर्मी व तिबेटच्या लामाचे अनुयायी होते; या लोकांची वस्ती बुखारा शहराच्या आसपास व पश्चिम भागांत होती, आणि तातीर लोक उत्तरभागांत सैबेरिया प्रांतांत व त्याच्या आसपास रहात होते. तथापि या लोकांची स्थाईक अशी कोठेंही वस्ती नव्हती, व ते गुरांचे कळप घेऊन त्यांना चारीत असत, हे लोक सर्व मध्यआशियाभर आपल्या टोळ्या करून भटकत फिरत, आणि गुरे चारून व आसपासच्या प्रदेशांत लूटफाट करून ते आपली उपजीविका करीत. या सर्व लोकांनी पुढे मुसलमानी धर्म स्वीकारिला व जगाच्या इतिहासांत पुढील काळांत ते अतिशय प्रसिद्धीत आले. तथापि मूळ अस्सल मुसलमान ह्मण ने आरय लोक हे असून त्यांना "सॅरॅसीन (सारासीन ) असेंही नांव आहे. तातीर व तुर्क हे उभयतांही एकच असून तातर लोकांनाच पुढे तुर्क ही संज्ञा प्राप्त झाली आहे. तुर्क व मोंगल या उभयतांनाही "दुराणी " अथवा "तुराणी " असे म्हणतात. तुराण देश म्हणजे हलींचा आशिया खंडांतील तुर्कस्थान हा देश असून त्यांतील पूर्वेच्या बाजूस म्हणजे चीनदेशाच्या उत्तरेकडील मंगोलिया या नांवाच्या प्रांतांत मोंगल लोक रहात असत ष पश्चिमेकडील बाजूस सुर्क लोक रहात असत, तुर्क आणि अश्य हे " 66 " ५