पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/८५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

अरबस्थान देशाने व आरय लोकांनी प्रमुखताने भाग घेतला होता; राजकीय दृष्टया संतोतंत म्हणावयाचे ह्मगजे आरय लोकांनी इ० सन ७११ पर्यंत हिंदुस्थानावर एकंदर तीन स्वाभ्या केल्या असे म्हणता येईल, त्यांपैकी पहिली म्हणजे खलांफा उमर याच्या कारकीर्दीत ६० सन ६३७ मध्यें आरच लोकांची एक टोळी ठाणे येथे आली होती, दुसरी म्हणजे, इ० सन ६६४ मध्ये, खलीफा मुआविया याच्या काळांत, मह घल या नावाचा एक आश्य सरदार समुद्रमार्गाने आपणाबरोचरील सैन्यांसह थेट मुलतान- पर्यंत गेला होता आणि तिसरी लणजे खलीफा वलीद याच्या कारकीर्दीत बसरा प्रांतांतून आपल्या सैन्यासह महमदुकाशीम यानें इ० सन ७११ मध्ये सिंधांतावर स्वारी केली होती; तथापि या शेवटच्या स्वारीसच राजकीय दृष्ट्या " स्वारी" असे नांव देता येईल; कारण त्या खारीचे परिणाम क्रांतिकारक असे घडून आलेले आहेत, तिकडील प्रजेवर भयंकर धार्मिक जुलूम होऊन तिचा अतिशय छळ झालेला आहे, रजनूत राजा दाहीर मारला जाऊन त्या राजघराण्याची धूळधाण उडालेली आहे, आणि त्या प्रांतांत काही काळपर्यंत आरब लोकांनी आपले राजकीय वर्चस्व स्थापन केलें आहे; इतकेच नाही तर सिंध प्रांतांत आलेल्या आस्य लोकांनी पुढे मुलतान व इतर ठिकाणी आपल्या वसाहती स्थापन केल्या आहेत, आणि अजमासें दोनशें वर्षेपर्यंत सिंध प्रतिति, खालपासून वर थेट मुलतानपर्यंत पैगंबराच्या सुरेश जातीच्या आरब लोकांनीं निरनिराळ्या ठिकाणीं, आपला अंमल गाजविला आहे. 44 बगदाद येथें आढयासी खलीफांच्या कारकीर्दीत, जसजसे त्यांचे सामर्थ्य कमी होत गेलें, तसतसें इराणी लोकांचें महत्व वाढत जाऊन, व ते प्रचळ होऊन स्यांच्यापैकी सामानी वंशातील एका शूर पुरुषानें आक्सस ऊर्फ अमुदार्या नदीच्या आसपासच्या प्रदेशांत आपले एक स्वतंत्र राज्य स्थापन केलें, आणि समर्केद ही त्याची राजधानी केली; हा वंश सामान या नावाच्या एका शूर सरदारापासून सुरु झाला असल्यामुळे त्यास “ सामानी " हे नांव प्राप्त झालें; बगदाद येथील खलोकांच्या काळांत, ३० सन ८०० च्या सुमारास, सामान हा खोरासान प्रांताचा कारभारी होता; हा मूळ फारसी धर्मानुयायी असून त्यानें आपल्या मुलासह मुसलमानी धर्म स्वीकारिला, या मुलाचे नांव आसदखान है असून त्यास अहंमद वगैरे चार मुलगे होते; हे चारीही मुलगे खलीफाच्या पदरी नौकरीस राहिले; आणि त्यानंतर ते चार निरनिराळ्या प्रांताचे अधिकारी यनले; यापैकीं फरगाण प्रांताचा अधिकार अहंमद यास मिळाला. ( इ० सन ८१९ मध्ये ) त्यानंतर दिवसेंदिवस तो अधिक अधिक प्रचळ होत गेला, आपल्या इतर भावांच्या ताब्यातील प्रांत त्याने आपल्या हस्तगत करून घेतले आणि