पान:मराठ्यांचा इतिहास भाग 2.pdf/९५

या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

एक धंदाच झाला. सेल्ज़क तुर्कीच्या गज्यांत गुलामांचा उदय झपाट्याने झाला. सेल्जुक सुलतान मलीकशहा ह्याच्या लष्करांतून पुढे अनेक पुरुष निरनिराळ्या प्रांताच्या कारभारावर राहून भरभराटीस चढले. त्यांस मलिकशहाचा गुलाम म्हणवून घेण्यांत मोठी धन्यता वाटे. जन्माने मनुष्य कितीही हलका असला तरीही त्यास इतरांच्या घरोचरीनें नाव काढण्याची सारखी संधी ह्या गुलामगिरीत मिळत असे. कित्येक सुलतानांची भक्ती प्रत्यक्ष मुलापेक्षा गुलामावर जास्त असे; एकवार गुलामगिरीतून वर जाऊन उदय झाल्यावर दरेक पुरूष पुन्हा आपल्याजवळ नर्वान गुलामांचा भरणा करी; आणि अशा रीतीनें ही गुग्रमांची संस्था नेहमीं दाढत जाऊन ती मुसलमानी राज्यास फार उपयोगाची झाली. तेराव्या शतकांत इजिप्त देश जिंकणारे मानेलूक नांवाचे तुर्क सुलतान आरंभी अशा गुलामांतूनच वाढलेले होते. महंमद घोरी व कुतुबुद्दीन यांनी गुलामांचे महत्व विशेष वाटत असे. एकदा महंमद घोरी आपल्या एका सोबत्याशी गोष्टी करीत बसला असता तो सोबती म्हणाला, कायहो आपणास मूल नाहीं, ही केवढी दुःखाची गोष्ट आहे. मूल असतें तर आपल्या वंशाचें नांव तरा पाठीमागे राहिलें असतें. त्यावर घोरी सुलतानानें उत्तर दिलं, काय, मला मूल नाहीं म्हणता | माझी मुले हजारों आहेत. हे तुर्की गुलाम माझ्या पदरीं जमले आहेत, हे माझी मुलें नाहीत तर कोण ! हे माझ्याहूनही जास्त पराक्रम करून माझें राज्य व कीर्ति वाढविणार नाहीत काय ? ही गोष्ट खरी ठरली. जी गोष्ट मुलास साध्य होणें शक्य नव्हते ती ह्या गुलामांनी सिद्धीस नेली. मुलगा झाला तरी बापासारखा शहाणा व पराक्रमी निघतोच असे नाहीं. पुष्कळ बापाचे पराक्रमामुळे घरांत श्रीमंती व ऐषआराम वाढून मुलें ऐदी व निःसत्यच बनतात. ती मुळे वाईट निपजली तरी त्यासच पुढे राज्यावर बसवावे लागते. त्यांस दूर सारण्याचे साधन रहात नाहीं. बाप सुद्धा आपल्या एखाद्या पराक्रमी सरदारास राज्य न देता आपल्या ऐदी मुलानें आपल्या मागे राज्यावर बसावें यासाठी हापापलेला असतो. पण गुलामगिरी म्हणजे पराक्रमाची शाळा, त्या शाळेतून निभावून बाहेर येण्यास अगची योग्यताच पाहिजे. योग्यता नसल्यास तो नाहींसा व्हावयाचा. अशा प्रकारें नाशयाच्या चाळणींतून गाळून निघाल्यावर जो निभावला, (Survival of the fittest ) तो गुलाम मुसलमानांच्या वृद्धीस ही संस्था आशिया खंडांत फारच उपयोगी पडली. आणि अफगाण सुलतानास तर तिजपासून चांगलाच फायदा झाला. महंमद घोरीचे चार मुख्य सरदार ह्या गुलामांतून पुढे आले. अफगाणिस्थानांत एल्डोस, सिंधप्रांतांन कुचाचा, बंगाल्यांत बखत्यार खिलजी आणि दिल्लीस कुतुबुद्दीन आरंभी गुलामांतून वर आले म्हणून त्याचे कूळ नेहमींच होन