पान:मराठ्यांचा इतिहास भाग 3.pdf/७७

या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( ५० )

राज्याच्या व शहाच्या कल्याणाकरितां अश्रुति परिश्रम घेतले होते, त्या राज्याविरुद्धचीं अनेक कारस्थानें मोडून टाकिली होती; व त्याच्या दुसतेमुळेच निजामशाहीच्या शत्रूंना त्या राज्याविरुद्धच्या आपल्या खटपटी यशस्वीपणें सिद्धीस नेता येत नव्हत्या. त्यामुळे या एकनिष्ठ वजीर चंगोझखान याचा नाश करण्याची निजामशाहीचे हितशत्रू व त्याचे प्रतिस्पर्धी एक-सारखी संधि पहात टन बसले होते. अशा स्थितीत बेदरच्या राज्याच्या वकिलानें निजाम-शहाचें मन चंगीझखानाविषयी अतिशय कलुषित केलें; आणि मुर्तुजशहानें कोणत्याही प्रकारें सन्यासोट्याचा तपास अथवा योग्य विचार न करता, त्यास विषप्रयोग करून ठार मारिलें; परंतु पुढे खरा प्रकार समजून आल्यावर चंगीझखानाच्या वधाचद्दल त्यास अतिशय पश्चाताप झाला; व यापुढे राज्य चालविण्याइतकी आपल्या मनाची योग्य स्थिति राहिली नाही, असे त्यास बाहून त्यानें कालांचेग, अमीर उलमुल्क, मिझमहमद नक्की आणि कासीमचेंग हकीम हे चार हुषार अधिकारी नेमून त्यांच्या हातीं राज्यकार मार सोपविला;आणि आपण अहमदनगर येथील राजवाड्यांतील “ बगदाद " या नांवाच्या उपमंदिरांत,आणि नंतर पुढे " बहिस्ती याग " या नावाच्या उद्यानातील राजवाच्यांत तो राहूं लागला.

 मूर्तुना निजामशहा, याच्याजवळ साहेबखान या नावाचा एक अतिशय निंद्यकर्मी,अनीतिमान् व सुगपानी मनुष्य असून तो शहाच्या इतक्या प्रेमांतील होता की, या पशुतुल्य आचरणाच्या व्यक्तीशिवाय तो दुसऱ्या कोणाचीही भेट घेत नसे. त्यामुळे त्याचें प्रस्थ अतिशय वाढून गेलें; आणि त्याच्या पापमय कृत्यांची परमावधि होत गेली; पण शहास त्याच्यावांचून क्षगमात्रही करमत नव्हते; त्यामुळे इकडे साहेबखानाची घटकोघटकी मर्जी जात असे, खप्पा होत असे; आणि “ हा भी चालों;" अशी शहास नेहमीं गुरकावणी दावीत असे; अशा स्थितीत एकदा तो खरोखरीच बेदर येथे निघून गेला; तेव्हा शहानें स्वतः तेथे जाऊन त्याची मनधरणी केली; व त्यास आपणाचरोचर नगर येथे परत आणिलें.त्यानंतर पुन्हां साहेबखानाने रागावून, मूर्तुजा शहास सोडिलें व तो नगर येथून निघून गेला;तेव्हा शहाने साहेबखानाची समजूत करून त्यास नगर येथे परत आणण्याकरिता आपले कांहीं सरदार त्याच्याकडे पाठविले; परंतु त्याच्याविषयी चोहोंकडे अत्यंत द्वेषभाव पसरलेलाअसल्यामुळे तो कोणासच हवा असा नव्हता; व त्याचा नाश करण्याचीच प्रत्येकजण संधि पहात होता, त्यामुळे याच सरदारांनी त्याची समजूत करून त्यास परत नेण्याचा प्रयत्न करण्याऐवजी, त्यास ठार मारिलें; आणि "आपणांशीच साहेबखानानें दंगा केला व त्यांत तो मृत्यू पावला; " असें खोटेच शहास सांगितलें; याप्रमाणे या महादुष्ट व नीच मनुष्याच्या कल्पनातांत थिंडवड्यांतून निजामशाही दरबार व प्रजा मुक्त झाली न झाली तोंच फत्तेशहा या नांवाच्या एका फकिरावर शहाची अतिशय मर्जी बसली; आणि याच वेळेपासून शहाच्या बेड-लीलामृताच्या दुरुन्या अध्यायास सुरवात झाली.